राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

मुलगी लग्नानंतरही माहेरी परकी होत नाही!

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : प्रतिनिधी
लग्न झाले म्हणजे मुलीचे तिच्या माहेरच्या कुटुंबासोबतचे नाते संपुष्टात येत नाही. ती परकी होते आणि कुटुंबावर अवलंबून राहत नाही, हे गृहीतक केवळ लैंगिक रूढीवादी मानसिकतेवर आधारित असून, ते राज्यघटनेच्या समानतेच्या तत्त्वावर अजिबात टिकणारे नाही, असा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती आणि सरकारी योजनांच्या लाभासंदर्भात हा निर्णय दिला आहे. केवळ ’विवाहित’ असल्याच्या कारणावरून मुलींना कुटुंबाच्या व्याख्येतून वगळणे हे पूर्णपणे मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील अमेठी येथील कुलसूम निशा या महिलेशी संबंधित आहे. कुलसूम यांच्या आई, बद्रून निशा या रेशन दुकान चालवत असत. मार्च 2024 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुलसूम यांनी अनुकंपा तत्त्वावर ते दुकान स्वतःच्या नावावर करण्यासाठी अर्ज केला होता. कुलसूम या आपल्या एका अंध बहिणीसह एकूण चार बहिणींचा सांभाळ करत होत्या.
मात्र, उत्तर प्रदेश सरकारच्या 2019 च्या एका आदेशानुसार ’विवाहित मुलगी’ ही ’कुटुंब’ या व्याख्येमध्ये बसत नाही, असे कारण देत प्रशासनाने त्यांचा अर्ज फेटाळला. मार्च 2025 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेही सरकारी निर्णयाचा हवाला देत प्रशासनाची कृती योग्य ठरवली. या अन्यायाविरोधात कुलसूम निशा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

समान हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा
सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आणि उत्तर प्रदेश सरकारचा नियम रद्दबातल ठरवला आहे. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलीला वगळणे हे घटनाबाह्य आहे, असा स्पष्ट निर्वाळा देत न्यायालयाने कुलसूम निशा यांना चार आठवड्यांच्या आत रेशन दुकानाचे वाटप करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या निर्णयामुळे देशभरातील विवाहित महिलांना अनुकंपा तत्त्वावरील नोकरी आणि इतर कल्याणकारी योजनांमध्ये समान हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

A girl does not become a stranger to her mother’s family even after marriage!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago