जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांचे आवाहन
नाशिक: जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाऊस झाला असून काही भागात अतिवृष्टीही झाली आहे. अगामी चार दिवसात जिल्ह्यात अतिप्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने धरण प्रकल्पातून विसर्गही सुरू असून प्रसंगी
विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क रहावे, तसेच नदी काठावर पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गंगाथरन डी. यांनी केले आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या मार्फत आलेल्या व्हाट्सऍप संदेशानुसार गेल्या तीन ते चार दिवसात झालेला मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे तसेच भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस मुसळधार पावसासोबत अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाची तीव्रता वाढल्यास धारणांमधील विसर्गाचे प्रमाणही वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, तसेच नदीकाठी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…