नाशिक

जिल्हा साहित्यिक मेळाव्याचा शुभारंभ

 

 

साहित्याला कटूता न बाळगता दाद द्या : प्रदीप निफाडकर

नाशिक : प्रतिनिधी

 

साहित्यिकांनी एकमेकांच्या लेखनाविषयी ,साहित्याविषयी कोणत्याही प्रकारची कटूता मनात न ठेवता दाद द्या असे प्रतिपादन गझलकार आणि कविता संमेलनाचे अध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी केले.

 

जिल्हा 53 व्या  साहित्यिक मेळावा काल (दि.1) शनिवार रोजी मु.श.औरंगाबाद सभागृहात पार पडला.

मेळाव्याचे उद्घाटन  संजय वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी  साहित्य मेळाव्याच्या अध्यक्ष  वंदना अत्रे  , उद्घाटक  संजय वाघ ,सावाना अध्यक्ष दिलीफ फडके ,सुनिल कुटे,धर्माजी बोडके ,वैद्य विक्रांत जाधव,गिरीश नातू , जयप्रकाश जातेगावकर,शंकर बोऱ्हाडे आदि मान्यवर उपस्थित होते .

 

निफाडकर म्हणाले ,नाशिकला साहित्यिकांची मोठा वारसा  आहे.  मराठी भाषेला समृध्द परंपरा  आहे. मराठी भाषेने  इतर भाषेतून अनेक गोष्टी घेत समृद्ध वाटचाल केली.  मराठी भाषेत 89 कविता प्रकार आहेत. एवढे कविता प्रकार कोणत्याच भाषेत आढळणार नाहीत. इतर भाषेतले कवितेचे प्रकार घेऊन आपण आपल्या कविता समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.

कवितेच्या विविध  प्रकाराविषयी कार्यशाळा घ्यायला हवी त्यातून नवीन साहित्यिकांना मार्गदर्शन मिळेल असे  मनोगत त्यांनी व्यक्त केले.

 

संजय वाघ  म्हणाले,

सावाना महाराष्ट्रासाठी भूषणावह  संस्था आहे. सावानाची  ग्रंथसंपदा पावने दोन लाख आहे.

समाजाला दिशा दर्शविण्यात काम साहित्यिक करतात..

समाजासाठी जे योग्य आहे,ते आपल्या लेखनातून मांडण्यात  काम लेखकांनी कराव.ज्वलंत विषयावर असलेले वास्तववादी साहित्य वाचकांना आवडत.

साहित्य समाजाचा आरसा असते.

काळानुरूप प्रत्येक गोष्टीच  मार्केटिंग करण्यास महत्त्व आल आहे. मार्केटिंग आणि पुरस्कारात   रमण्याऐवजी साहित्यात योगदान द्याव.

लहान मुलांच भावविश्व बदलल आहे. त्यामुळे बालसाहित्य लेखन करताना आजच्या मुलांच्या भावविश्वाचा विचार करायला हवा. लहान मुल

मराठी  बोलताना आणि लिहताना मुल  कमी पडतात. त्यासाठी पालकांनी आणि मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करायला हवेत.

 

 

 

वंदना अत्रे म्हणाल्या,

गझलला इश्क आणि मदीरातून बाहेर काढण्याचे काम  ..गझलकार प्रदीप निफाडकर यांनी केले तर . लहान लेकरांच्या एकाकीपणाची काळजी घेत त्यांचा  एकाकीपणा घालवण्यासाठी  संजय वाघ यांनी आपल्या बाल साहित्यातून प्रयत्न केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

 

दिलीप फडके यांनी यावेळी  आपले मनोगत व्यक्त केले.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर पार पडलेल्या 53 व्या जिल्हा साहित्य मेळाव्याला साहित्यिकांनी गर्दी केली होती.

कार्यक्रमाचे प्रस्तावित संजय करंजकर यांनी केले. तर आभार गणेश बर्वे यांनी मानले .

 

कवि संमेलन रंगले

 

कोरोनाच्या प्रादुर्भावनंतर  दोन वर्षानी भरलेल्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याला  साहित्यिकांनी  गर्दी केली होती. यावेळी रंगलेल्या कवि संमेलनात साहित्यिकांनी विविध कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

 

 

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago