लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम
नाशिक : प्रतिनिधी
घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे यांना पाच हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
तक्रारदार यांची मोटरसायकल एमएच 15, जेयू 0702  तक्रारदारांची मुलगी  आजारी पडल्याने  औषधोपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ती योगेश पुंजाजी वाघ यांच्याकडे गहाण ठेवली होती. त्याबदल्यात बारा हजार रुपये घेतले होते. तक्रारदार यांनी योगेश वाघ यांना त्यांच्याकडून मोटरसायकल गहाण ठेवून घेतलेले रुपये व्याजासह परत करूनही मोटरसायकल परत केली नाही म्हणून तक्रारदार हे योगेश वाघ यांच्याकडे  मोटरसायकल परत देण्यासाठी  तगादा लावला होता. वाघ यांनी तक्रारदार यांच्या घरी येऊन त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण केली.म्हणून तक्रारदाराच्या पत्नीने  वाघविरुद्ध घोटी पोलीस स्टेशन येथे एन सी नोंद केली होती. हवालदार राजाराम डगळे  यांनी मोटरसायकल परत मिळवून देऊन त्या मोबदल्यात तक्रारदारांकडे पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती  दहा हजारांवर सौदा ठरला. पहिला हप्ता 5,000/- रुपये स्वीकारत असतानाच सापळा पथक त्यांच्या दिशेने येत असल्याचे बघून हवालदाराने धूम ठोकली. त्यांच्याविरुद्ध घोटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार पंकज पळशीकर, प्रमोद चव्हाणके यांच्या पथकाने अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *