तिसर्‍या श्रावण सोमवारच्या फेरीसाठी त्र्यंबकला भाविक दाखल

दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या
तिसर्‍या सोमवारच्या ब्रह्मगिरी
प्रदक्षिणेसाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. रविवार (दि. 10) दुपारपासून भक्तांचा ओघ सुरू झाला असून, येथे बसस्थानकावरून थेट
कुशावर्तावर येऊन लागलीच
फेरीला जाणारे भाविक होते.
शनिवारी रात्री आलेले भाविक रविवारी सकाळपासून ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीच्या उगमस्थानी दर्शनासाठी जात होते. सकाळी आठ वाजेला बह्मगिरीवर गेलेले भाविक परत येतांना भातखळा धर्मशाळेपासून मधल्या मार्गाने गंगाद्वार येथे येऊन गोरक्षनाथ
गुंफेत दर्शन घेऊन नंतर त्र्यंबकेश्वर शहरात सायंकाळच्या सुमारास येताना दिसत होते. बह्मगिरी पर्वतावर जाणारे आणि येणारे भाविक यांची एकच दाटी झाल्याने भाविकांना एकाच जागेवर थांबवले जात होते. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांच्या मार्गदर्शनाने येथे वन विभागाने कर्म चारी तैनात केले होते. रविवारी दुपारी दोन वजेच्या सुमारास खंबाळा वाहनतळ सुरू करण्यात आले.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपअधीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी बंदोबस्त तैनात केला आहे. तळेगाव फाटा, अंबोली व पहिने येथे खासगी वाहने वळवण्यात येवून ती वाहतळावर लावली गेली आणि भाविक प्रवाशांना एसटी बसने त्र्यंबकेश्वर येथे सोडण्यात येत होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी कुशावर्तासह सर्वत्र रेनकोट घातलेले भाविक दिसून येत होते. कुशावर्तावर गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्र्यंबक नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी व मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके यांनी सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन शहरातील सुविधांबाबत सूचना दिल्या आहेत. दोन दिवसांपासून मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकारी पूर्वा माळी, शहर अभियंता स्वप्नील काकड यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी येथे तळ ठोकून आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवार, डॉ. प्रशांत पाटील आणि सर्व वैद्यकीय अधिकारी, तसेच पंचात समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांनी प्रदक्षिणा मार्गावर, तसेच शहरात वैद्यकीय पथकांचे नियोजन केले आहे. सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *