oplus_2097152
इंदिरानगर : वार्ताहर
नाशिक शहरातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वरील इंदिरानगर बोगदा येथे कामाला सुरुवात होणार आहे. कालपासून (दि. 19) हा बोगदा वाहतुकीसाठी बंद केला आहे. इंदिरानगर बोगदा येथे ग्रेड सेपरेटर फ्लायओव्हरचे बांधकाम होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे काम टप्प्याटप्प्याने होईल.
कामामुळे बोगदा तात्पुरता बंद
सुरुवातीला 27 ऑक्टोबरपासून बोगदा बंद करण्याचा निर्णय होता. वाहनांची गर्दी लक्षात घेऊन नियोजन बदलले. वाहतूक पोलिसांकडून काम थांबवले गेले होते. आता सुधारित नियोजन अंतिम झाले आहे. पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाल्याने काम सुरू होणार आहे.
इंदिरानगर बोगदा: पर्यायी वाहतूक व्यवस्था
इंदिरानगर बोगदा खालील वाहतूक आता पूर्णपणे थांबवली आहे. ये-जा करणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली गेली आहे. गोविंदनगर आणि इंदिरानगर बाजूकडील सर्व्हिस रोड आता एकेरी केले आहेत. हे काम नऊ महिने चालणार आहे.
गोविंदनगरकडे जाणारी वाहतूक
साईनाथनगर सिग्नलकडून गोविंदनगरकडे प्रवेश बंद आहे. सिटी सेंटर मॉलकडे जाणारी वाहनेही वळवली आहेत. खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई नाक्याकडील वाहतूक बदल
मुंबई नाका बाजूकडील सर्व्हिस रोडने भुजबळ फार्म व लेखानगरकडे प्रवेश बंद आहे. इंदिरानगर बाजूकडील सर्व्हिस रोडने लेखानगरकडून मुंबई नाक्याकडे प्रवेश बंद आहे.
नवीन वळण मार्ग
साईनाथनगर सिग्नलकडून इंदिरानगर बोगद्याकडे येणारी वाहतूक डावीकडे वळेल. ही वाहतूक सर्व्हिस रोडने लेखानगरमार्गे जाईल. सिटी सेंटर मॉल/गोविंदनगरकडून येणारी वाहतूक मनोहर गार्डन येथे डावीकडे वळेल. उड्डाणपूल पोल क्र. 170 वरून यू-टर्न घेऊन पुढे जाण्याची सूचना आहे.
आठ मीटरचा समांतर बोगदा
सध्याच्या बोगद्याला समांतर असा आठ मीटरचा बोगदा तयार होणार आहे. यामुळे सर्व्हिस रोडवरील वाहतूक बोगद्यावरील रस्त्याने जाईल. राणेनगरकडे जाणाऱ्या वाहनांना खाली उतरावे लागणार नाही. गोविंदनगरकडे जाणारी वाहने या बोगद्यातून जातील. यामुळे इंदिरानगर बोगदा जवळची वाहतूक कोंडी कमी होईल..
येत्या 1 मेपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण केले जाईल. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल. काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीची पर्यायी व्यवस्था केलेली आहे.
– श्रीकांत ढगे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…