खवय्येगिरी: श्रीखंड स्टुडिओ
खरे तर खवय्यासाठी नवनवीन पदार्थ चाखणे खवय्यासाठी आवडीचे असते. मात्र, जर एकाच पदार्थाचा वेग वेगळ्या स्वादानुसार आस्वाद घेणे ही मेजवाणीच आहे. त्यामुळेच बाप्ते बंधुनी दोन वर्षापूर्वी शहरात श्रीखंड स्टुडिओ सुरू केला. स्टुडिओ म्हटले की, शुटिंगसाठीच ही संकल्पना मनात रूढ झालेली असते. मात्र नाशकात आता श्रीखंड स्टुडिओ ही संकल्पना रूढ होत आहे. सर्वसामान्यपणे श्रीखंडाचे दोन प्रकार सर्वांनाच माहिती आहेत. श्रीखंड आणि आम्रखंड. पण श्रीखंड स्टुडिओमध्ये ब्लॅक करंट, सीताफळ, पेरू, अंजीर, ड्रायफ्रूट, पानमसाला, बटर स्कॉच यांसह 36 फ्लेव्हरचे श्रीखंड खवय्यांना चाखण्यास मिळत आहेत. 36 फ्लेव्हरच्या श्रीखंडाना पसंती दिली जात आहे. ग्राहकही सर्व प्रकारच्या श्रीखंडाचा आस्वाद घेत आहेत.भोसला सर्कलजवळ आणि पंचवटीतील सिता गुंफश कॉर्नर जवळ श्रीखंड स्टुडिओ आहे.
अविनाश बाप्ते, ( संचालक, श्रीखंड स्टुडिओ )