सिडको : विशेष प्रतिनिधी
इंदिरानगर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट-2 यांच्या संयुक्त तपासातून अवघ्या काही तासांत एक अनोळखी खुनाचा गुन्हा उकलण्यात आला. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. एका विधिसंघर्षित बालकाचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील गरवारे हाउसजवळील बसस्टॉपच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी भेट दिली असता, या व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच सिडको भागातील अशोक रामा काळे यांनी मृत व्यक्ती ही त्यांचा मुलगा संतोष ऊर्फ छोटू अशोक काळे (वय 37, रा. इंदिरा गांधी वसाहत, सिडको) असल्याची ओळख पटवली. त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या अधारे मृताला दोन जणांंनी मोटारसायकलवरून नेले होते. पुढील तपासात मृताची पत्नी पार्वती संतोष काळे हिचे नगरमधील
प्रफुल्ल दिलीप कांबळे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. अधिक विचारपूस केली असता, पार्वतीने तिच्या प्रियकरासोबत संगनमत करून पतीचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस तपास पथकाने तत्काळ कारवाई करत प्रफुल्ल कांबळे (वय 30 रा. बोल्हेगाव, जि. अहिल्यानगर) व त्याचा साथीदार योगेश बाळासाहेब जाधव (वय 23, रा. बोल्हेगाव, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत एका विधिसंघर्षित बालकाचा सहभागही निष्पन्न झाला आहे. ही कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर गुन्हेशोध पथक व गुन्हे शाखा युनिट-2 नाशिक शहर यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाल्मीक चौधरी करत आहेत.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…