लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालणं ही आपली परंपरा मानली जाते. पण आजकाल बर्याचदा धावपळीच्या आयुष्यात आणि वाढत्या चोरीचकारीमुळे मोठं मंगळसूत्र घालणं शक्य नसतं किंवा महिलांना गळ्यात मंगळसूत्र सगळ्या कपड्यांवर घालणं सूट होत नाही असं वाटतं. त्यामुळे आता बदलत्या ट्रेंडनुसार ब्रेसलेट मंगळसूत्र घालताना आता बर्याच महिला दिसतात. मुळात हे ब्रेसलेटप्रमाणे असल्यामुळे कोणत्याही कपड्यांवर उठून आणि आकर्षक दिसतं आणि बर्याचदा पटकन एखाद्याच्या डोळ्यातही भरत नाही. तसंच तुमच्या हातात असल्यामुळे सुरक्षितही राहतं. आता ट्रेंडनुसार महिला मंगळसूत्र ब्रेसलेट अथवा रिंग्ज स्वरूपात घालताना दिसून येतात. त्यामुळे याचे आता वेगवेगळे डिझाईन्स यायला सुरूवात झाली आहे. अगदी सामान्य महिलांना आणि विशेषतः ऑफिसला जाणार्या महिलांना हे ब्रेसलेट मंगळसूत्र जास्त पसंतीला येत असल्याचे दिसून येत आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…