नाशिक

भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी

नाशिकरोड : वार्ताहर
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन नाशिकरोडला सर्व जैन बांधवांनी संघटितपणे प्रातःकाळी भव्य शोभायात्रा काढून अतिशय शांततेत पण ढोल-ताशांच्या गजरात साजरा केला.
यात स्थानकवासी, ओस्वाल, श्वेतांबर, दिगंबर असे सर्व पंथातील जैन महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी 7.30 वाजता भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष निर्मल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली जैन स्थानकापासून ही शोभायात्रा काढण्यात आली. आर्टिलरी सेंटर मार्गे दिगंबर जैन मंदिरापर्यंत तेथून कपालेश्वर मार्गे देवळाली गाव, म. गांधी पुतळा, सुभाषरोडमार्गे, डॉ. आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून, बिटको पॉइंट, महात्मा गांधी रोडने जैन स्थानकात तिचा समारोप करण्यात आला. भगवान महावीरांच्या जीवनावरील आकर्षक चित्ररथ, ढोल पथक, बँड, शाळकरी मुलांचे लेझीम पथक, भजनी मंडळाने या शोभायात्रेचे आकर्षण वाढविले होते. रस्त्यावर त्यांचे पाणी व थंडपेय देऊन स्वागत करण्यात येत होते. विशेष म्हणजे रिकाम्या बॉटल्स, कागदी कप हा कचरा त्वरित उचलण्यात येत होता. त्यामुळे मिरवणुकीनंतरही रस्ते स्वच्छ दिसत होते. हा आदर्श जैन बांधवांनी घालून दिला आहे. जैन स्थानकात प.पू. विरागसाधनाजी म.सा., विरक्तीसाधनाजी म.सा., डॉ. लक्षित साधनाजी म.सा. यांच्या सान्निध्यात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच आशीर्वाद प्रवचन झाले. येथे रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. या शोभा यात्रेत जैन श्रावक संघाचे संघपती डॉ. किरणमल धाडीवाल, समिती अध्यक्ष निर्मल भंडारी, उपाध्यक्ष विनय भंडारी, सेक्रेटरी मनीष शहा, उमेश चोपडा, संजय सुराणा व विश्वस्त मंडळ यांनी या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले होते.

यांची होती उपस्थिती

या शोभायात्रेत जैन श्रावक संघाचे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्यांसह सकल जैन समाज, आनंद व महावीर नागरी सहकारी पतसंस्था, भारतीय जैन संघटना, जैन सोशल ग्रुप, अन्न पुण्य ग्रुप, व्ही.आर. ग्रुप, माहेश्वरी महिला मंडळ, युवा मंच, अजय संघवी प्रतिष्ठान या संस्थांच्या पदाधिकार्‍यांसह आ. सरोज आहिरे, माजी नगरसेवक ज्योती खोले, श्याम खोले, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, संभाजी मोरुस्कर, अंबादास पगारे, संजय भालेराव, शांताराम घंटे, राष्ट्रवादीचे मनोहर कोरडे, ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, भाईजान बाटलीवाला, वसीम शेख, दिलीप भोसले, विजय संकलेचा, विजय चोरडिया, डॉ. पी. एफ. ठोळे, संतोष मंडलेचा, सुभाष बोथरा, प्रकाश कोठारी, दिलीप संकलेचा, कन्हय्यालालजी कर्नावट, महेंद्र धाडीवाल, अजित संकलेचा, मिलिंद चोपडा, डॉ. राजेंद्र मंडलेचा, चांदमल कोचर, सतीश धाडीवाल, सुरेश चोरडिया, प्रेमचंद अलिझाड, दिलीप वर्मा, सुभाष भंडारी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Gavkari Admin

Recent Posts

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

1 day ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

1 day ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

1 day ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

1 day ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

2 days ago

ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर

ऑनलाइन  गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर:  साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…

4 days ago