विश्वामध्ये अशा काही शक्ती आहेत त्या गुप्तरूपाने वावरत असतात, तर काही बिकट रूपाने दिसतात. ग्रहण किंवा उपग्रह या दोन्ही भागात त्यांचे विभाजन केले जाते. ज्या शक्तीचा आंतरिक आकार छोटा परंतु घनत्व असते यामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी, मंगल इत्यादी… गोष्टींचा उल्लेख करता येईल. त्यात दुसरा भाग घनत्व कमी असेल परंतु आकार मोठा असेल त्यात बृहस्पती-शनि इत्यादी….अशा ग्रहशक्ती शोधायला मनाची परिपक्वता लागते. त्या ग्रहांची स्थिती, त्यांची गती, त्यांचा प्रभाव याचा शोध घ्यायला मनाची अवस्था कामी येते. ‘मन’स्थिती ठीक नसेल तर त्याचे अनुमान काढता येणार नाही. मनाची एकाग्रता महत्त्वपूर्ण मानली जाते. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो. त्या पृथ्वीवरील भूभागावर चंद्राला सूर्य ढकलतो, तेव्हा सूर्यग्रहणाची निर्मिती होते. अशा ग्रहणाचा अभ्यास करायला मनाची स्थिरता महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण चंद्र हा प्रकाशनहीन आहे. तो सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होत असतो. कारण चंद्राच्या गतीवरच सूर्याची आणि पृथ्वीची सापेक्ष स्थिती बद्दल राहतो. चंद्राचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे.
मनाच्या स्थितीवरून आत्म स्वरूपाची व बुद्धीची गती-विधि बदलत राहते. या सर्वांना कारणीभूत मनाची आंतरिक ऊर्जा अस्तित्वात असते. शरीरातील मनाचा, पृथ्वीवरील भूभागाचा आंतरिक प्रक्रियेवर परिणाम होतो. ज्याप्रमाणे भूभागाचा आंतरीक प्रक्रियेवर परिणाम होतो. तापमान, दबाव, घनत्व यानुसार पृथ्वीच्या आंतरिक प्रक्रियेची जाणीव होते, त्याप्रमाणे मनावरून त्याच्या बुद्धी व चित्ताची व आत्म्याची जाणीव होऊ शकते. मनुष्याच्या आंतर प्रक्रियेत जसा बदल घडतो तोच ग्रहशक्तीच्या हालचालींवरून सृष्टीत घडत असतो. जसा भूगर्भात बदल झाले की भूकंप होतो, तसा मनात विकृती आली कि क्रोधरुपी भूकंप होतो आणि काही जणांचे प्राण जातात किंवा वास्तविक संतुलन बिघडते. ग्रहांची स्थिती, तीच मनाची स्थिती असते. त्यानुसार सृष्टीत व मनात बदल घडत असतात.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज