दिंडोरी : प्रतिनिधी
सप्तशृंगगडावर दर्शनासाठी जाणार्या भाविकांची पिकअप उलटून झालेल्या अपघातात 14 जण जखमी झाले. त्यात तीन बालकांचा समावेश आहे. जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील तीन जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले.
सप्तशृंगगडावर दर्शनासाठी 25 भाविक पिकअप गाडीने मंगळवारी (दि.27) सकाळी साडेदहाच्या सुमारास जात होते. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या 15 फूट चारीत पिकअप कोसळली. त्यातील 14 जण जखमी असून, त्यात तीन बालकांचा समावेश आहे. सर्व प्रवासी बागलाण तालुक्यातील दोदेश्वर परिसरातील कोळीपाड्यातील आहेत. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.
जखमींत सोनाबाई जाधव (वय 35), सुनीता गणपत लवारे, सीमा कावळे (25), शिवानी गायकवाड (वय 7 वर्षे), शिवानी मनोहर पवार (7),वर्षा गायकवाड (23), शीतल रामदास गायकवाड (40), ज्ञानदा पवार (38), अभिजित शंकर गायकवाड (4), शंकर खंडू गायकवाड (23), ज्योती रामदास गायकवाड (17), दत्ताबाई अभिमन पवार (30) शुभम वामन गातवे (25), यश अर्जुन घोडे (वय 19). सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनाली गायधनी, डॉ. राहुल पटाईत यांच्यासह वणीतील खासगी डॉक्टर अनिल शेळके, डॉ. विराम ठाकरे, डॉ. सोहम चांडोळे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमींवर उपचार केले. 14 पैकी तीन जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले.