सिडको : वार्ताहर
अंबड पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या किराणा दुकानातून तब्बल साडेतीन लाखांचा पानमसाला गुटखा जप्त केला.नाशिक शहरात अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारताच आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व अवैध व्यवसायांवर कारवाईचे आदेश दिले होते.
दरम्यान (दि.7) रात्री अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय व रेकॉर्ड वरील गुन्हेगार तपासणीकरिता वपोनी युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन सुरु असतांना उपनिरीक्षक सुनील बिडकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या मुसळे ट्रेडर्स या किराणा दुकानावर पोलीस पथकाने छापा टाकत तेथील गोडावूनमधून 10 पोते विमल पानमसाला तसेच रजनीगंधा, जर्दा असलेला गुटखा असा तब्बल साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.ही कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली गून्हेशोध पथकाचे सहायक निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक सुनील बिडकर, हरिसिंग पावरा, उत्तम सोनवणे,संदीप पवार यांच्यासह अधिकारी व अंमलदारांनी केली
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…