आस्वाद

स्त्री म्हणजे संघर्षाची जिवंत निशाणी

अश्रूंना लपवून हास्य देते,
दुःखातूनही नवी ताकद घेते.
जगाला सांगू या तिची कहाणी,
स्त्री म्हणजे संघर्षाची जिवंत निशाणी.
स्त्री म्हणजे केवळ माया आणि प्रेम नव्हे, तर ती संघर्षाची जिवंत मूर्ती आहे. जन्मापासूनच तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी शिक्षणासाठी लढावे लागते, तर कधी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी समाजाच्या चौकटी मोडाव्या लागतात. आई म्हणून ती कुटुंबासाठी त्याग करते, मुलगी म्हणून स्वप्न पाहते आणि त्या स्वप्नांसाठी अहोरात्र मेहनत घेते. संकट कितीही मोठे असले तरी ती हार मानत नाही. तिच्या डोळ्यांत अश्रू असले तरी ओठांवर हास्य ठेवून ती पुढे चालत राहते.
इतिहासातही अनेक महिलांनी संघर्ष करून समाजात बदल घडवला. शिक्षणासाठी लढणार्‍या सावित्रीबाई फुले असोत किंवा अंतराळात झेप घेणार्‍या कल्पना चावला त्यांच्या जिद्दीने संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे.
आजच्या महिला दिनानिमित्त आपण प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाला सलाम करूया. तिच्या स्वप्नांना पंख देऊया आणि तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करूया. कारण स्त्री आहे तरच समाजाची खरी प्रगती शक्य आहे. आजच्या महिला दिनानिमित्त आपण फक्त शुभेच्छा देऊन थांबू नये, तर प्रत्येक स्त्रीला समान संधी, सन्मान आणि सुरक्षितता देण्याची प्रतिज्ञा करूया. तिच्या स्वप्नांना आधार देऊया, तिच्या संघर्षाला ओळख देऊया आणि तिच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगूया. कारण स्त्री हीच समाजाची शक्ती, प्रगती आणि उज्ज्वल भविष्य आहे.
मेरी क्यूरी दोन वेळा नोबेल पारितोषिक मिळवणारी महान शास्त्रज्ञ. पुरुषप्रधान क्षेत्रात प्रचंड संघर्ष करून यश मिळवलं. प्रतिभाताई पाटील अत्यंत साध्या कुटुंबातून जागतिक कीर्ती मिळवली. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. महाराष्ट्रातील साध्या कुटुंबातून येऊन त्यांनी देशातील सर्वोच्च पद मिळवले. सुधा मूर्ती प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका. साधेपणा, मेहनत आणि समाजासाठी केलेल्या कामामुळे त्या खूप आदर्श मानल्या जातात. साधेपणा, कष्ट आणि समाजासाठीची जाणीव यामुळे सुधा मूर्ती या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत. असे अनेक उदाहरणे आहेत… अशी अनेक प्रेरणादायी उदाहरणे आहेत की, ज्यांनी संकटांना न घाबरता मेहनतीच्या जोरावर आपला नावलौकिक केला. अशा महिलांच्या कार्यामुळे समाजाला नवी दिशा आणि प्रेरणा मिळते. अवनी चतुर्वेदी : या भारतीय वायुसेनेतील महिला फायटर पायलटपैकी एक. यांनी आकाशात झेप घेत महिलांच्या सामर्थ्याचा नवा इतिहास घडवला.
तिच्या पावलांखाली संघर्षाची वाट,
तरीही डोळ्यांत उज्ज्वल उद्याचीच आस.
स्त्री ही फक्त एक व्यक्ती नसून अनेक रूपे घेऊन समाज घडवते. आई, मुलगी, बहीण, पत्नी, शिक्षिका, डॉक्टर, अधिकारी अशा अनेक भूमिका ती सक्षमपणे पार पाडते.आज स्त्रिया शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, साहित्य, न्यायव्यवस्था अशा सर्व क्षेत्रात मोठे यश मिळवत आहेत. अजूनही काही ठिकाणी स्त्रियांना अन्याय, भेदभाव, हिंसा यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे समाजाने स्त्रीचा सन्मान करणे आणि तिला समान संधी देणे खूप गरजेचे आहे.स्त्री ही शक्तीचे प्रतीक आहे. तिच्या जिद्द, कष्ट आणि प्रेमामुळे कुटुंब आणि समाज मजबूत होतो. आई म्हणून संस्कार देणारी, मुलगी म्हणून प्रेम देणारी आणि पत्नी म्हणून साथ देणारी स्त्री कुटुंबाचा आधार असते.स्त्री आपल्या कष्टाने आणि समर्पणाने समाज घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, कल्पना चावला, किरण बेदी यांसारख्या अनेक महिलांनी समाजाला नवी दिशा दिली. स्त्री ही शक्ती, ममता आणि सहनशीलतेचे सुंदर रूप आहे.स्त्री ही शक्ती, ममता आणि सहनशीलतेचे सुंदर आहे.
तीच माया, तीच शक्ती,
तीच जीवनाचा आधार,
तिच्या कष्टांनीच उजळतो
घराचा प्रत्येक दरबार.
स्त्री सन्मान राखला तर
समाज उंच भरारी घेईल,
तिच्या सामर्थ्यानेच
उज्ज्वल भविष्य घडत राहील.
महिला म्हणजे केवळ आई, बहीण किंवा पत्नी एवढेच नाही, तर प्रत्येक मुलगी, तरुणी आणि स्त्री म्हणून यांचा आदर करणे समाजाचे कर्तव्य आहे. आजच्या काळात दुर्दैवाने असे दिसते की, छोट्या मुलींपासून मोठ्या महिलांपर्यंत कोणीच पूर्णपणे सुरक्षित नाही. म्हणूनच महिलांचा सन्मान फक्त एका दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षातील प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी केला गेला पाहिजे. स्त्रीला सुरक्षितता, सन्मान आणि समानता देणे हीच खर्‍या अर्थाने समाजाच्या प्रगतीची खूण आहे.मला अभिमान आहे की, मी एक स्त्री आहे आणि दुसर्‍या स्त्रीचा आदर करणे हे माझे कर्तव्य आहे. स्त्रीने स्त्रीला साथ दिली, सन्मान दिला तरच समाज अधिक मजबूत आणि सुंदर होईल. जिजाऊंसारख्या मातेनं शिवबासारखा महान पुत्र घडवला, म्हणूनच स्त्रीची शक्ती आणि तिचे संस्कार किती महान असतात हे जगाला कळते. महिला दिन आपल्याला हेच शिकवतो की, स्त्रीला समान हक्क, सुरक्षितता आणि सन्मान मिळाला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून असा समाज घडवू या जिथे प्रत्येक स्त्री स्वाभिमानाने, निर्भयपणे आणि आनंदाने जगू शकेल.
महिला दिन आपल्याला स्त्रीच्या सामर्थ्याची आणि तिच्या कर्तृत्वाची जाणीव करून देतो. स्त्रीचा सन्मान, तिची सुरक्षितता आणि समान हक्क यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चला, आज आपण असा संकल्प करूया की, प्रत्येक स्त्रीला आदर, सन्मान आणि सुरक्षिततेने जगता येईल असा सुंदर समाज घडवू.
स्त्रीचा सन्मान करा,
तिच्या स्वप्नांना पंख द्या,
समतेचा आणि सुरक्षिततेचा
सुंदर समाज घडवा.
डोळ्यांत नकोत अश्रू तिच्या,
ती दुःख सहन करूनही जग घडवते.
तिच्या मायेच्या आणि सामर्थ्याच्या जोरावर, समाजाला नवी दिशा मिळते
तिच्या मायेच्या आणि सामर्थ्याच्या
जोरावर, समाजाला नवी दिशा मिळते….

A woman is a living symbol of struggle.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago