महाराष्ट्र

हिंदू संस्कृतीतील चिन्हांची ओळख

हिंदू संस्कृती मध्ये अनेक चिन्हे अक्षर, संख्या चित्र व मानक स्थापित केलेली आहेत ज्यांचा संबंध भगवंताने मानवाच्या कल्याणासाठी दिलेल्या महा वाक्यांशी लावला जातो. ही चिन्हे अक्षर संख्या व चित्रांमुळे आपली संस्कृती भरलेली आहे. यातूनच सर्वांना ज्ञानाची एक दिशा मिळत असते. यापैकी सर्वात पवित्र चिन्ह म्हणजे ओम होय. असे म्हणतात की सृष्टी मध्ये सर्वात पहिला नाद ध्वनी हा ओम ध्वनी उत्पन्न झाला होता. या मधूनच पुढे संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली असे मानण्यात येते. म्हणजेच ओम् मधून आपणास सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान मिळत असते. या ध्वनी मधून आपल्याला स्वतःचे म्हणजे आत्म्याचे व परमात्म्याचे सुद्धा ज्ञान मिळत असते. ओम् शांती म्हणजे मी या पंच तत्वाच्या शरीरात बसलेली चैतन्य शक्ती आत्मा होय. आणि ओम शांती म्हटल्यानंतर मी शांत स्वरूपात आहे असे मानण्यात येते. याच प्रमाणे ओम परमात्माय नमः ओम गणेशाय नमः ओम महेश आय नमः अशाप्रकारे भगवंताची स्तुती गायली जाते अर्थात मी आत्मा गणेशाचे स्तवन करतो मी आत्मा परमात्म्याचे स्तवन करतो मी आत्मा शंकरजीचे स्थवन करतो असा हा ओम चा महिमा
होय.ओम या पवित्र अक्षराचे प्रत्येक अवयव बघितले तर यातून आपल्याला सृष्टीच्या यादीमध्ये अंताचे ज्ञान मिळत असते ओम् च्या प्रत्येक अवयवांना एक विशिष्ट नाव देण्यात आलेले आहे ही पाच नावे म्हणजे आकार ऊकार् मकार अर्धमातृका व अनुस्वार असे पाच अवयव सांगण्यात येतात. यातील अकार म्हणजे ब्रम्हा उकार म्हणजे विष्णू मकार म्हणजे महेश होय. म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे रचिता एक निराकार शिव परमात्मा याचेच प्रतिक म्हणजे अनुस्वार दाखवण्यात आलेला आहे हा अनुसार म्हणजे निराकार परमपिता परमात्मा शिव होय. मात्र शिव हे निराकार असल्यामुळे ते साकार शरीराचा आधार घेऊन आपले दिव्य कार्य करीत असतात यासाठीच ओम् मधील अर्ध मातृका चंद्रकोर ही परमात्म्याच्या सृष्टी वरील दिव्य अवतरण चे प्रतीक आहे. त्याच प्रकारे आपण जर बघितले तर शिवलिंगावर बेलपत्र वाहिली जातात बेलाला तीन पानं असतात हे तीन पाने म्हणजेच ब्रह्मा विष्णू व महेश या तीन देवस्थान मार्फत भगवंत सृष्टीच्या स्थापना पालन व विनाशाचे कार्य करीत असतात अशाप्रकारे आपणास ओम चिन्हामधून सृष्टीच्या अगम आणि निगमाचे कोडे उलगडते. हा ओम ध्वनि आपल्या जीवनात अतिशय आमूलाग्र बदल घडू शकतो. या ओम ध्वनीद्वारेच अनेकानेक ऋषी-मुनींनी साधकांनी तपस्विनी अनेक चमत्कार सिद्धी प्राप्त केलेली आहे. आपणही आपल्या जीवनात या ओम ध्वनिद्वारे अनेक सिद्धी प्राप्त करू शकतो. या ओमची खरी महती व संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेच्या सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी.
ब्रह्म्रकुमारी पुष्पादीदी

Bhagwat Udavant

Recent Posts

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

1 hour ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

8 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

9 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

9 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

9 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

9 hours ago