विविध योजनांतून मिळते मदत
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील दिव्यांग शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच बेरोजगार दिव्यांगांना , विकलांग असलेल्यांना लाभ मिळावा , यासाठी शासनस्तरावर विविध योजना राबविण्यात येत आहे . यामध्ये पहिली ते बारावी तसेच बेरोजगार दिव्यांग , पूर्ण विकलांग अशा विविध टप्प्यात त्यांना अर्थसहाय्य देण्यात येते . तसेच विविध योजनांतून मदत केली जाते . दरम्यान २०२१ २२ या वर्षात या दिव्यांग लाभार्थ्यांना मनपाने १ कोटी १२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे . प्रौढ बेरोजगार दिव्यांगांना प्रतिमहिना दोन हजार रुपये तर पूर्ण विकलांग दिव्यांगांना प्रतिमहिना दोन हजार रुपये अनुदान देण्यात येते . त्याचप्रमाणे पहिली ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्याथ्र्यांना दरमहा लाभ देण्यात येतो . यामध्ये एकूण २६१३ दिव्यांग असून , त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे . या शिष्यवृत्तीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे . शहरात २६१३ दिव्यांग असून , त्यांना विविध योजनेतून महापालिकेच्या वतीने अर्थसहाय्याचा देण्यात येतो . पहिली ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी वीस हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते . बारावीनंतर पदवीपर्यंत प्रति वर्ष २५ हजार रुपये तर पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याला तीस हजार रुपये प्रती महिना लाभ देण्यात येतो . या योजनेत आता वाढ करण्यात येणार आहे . तसेच शहरातील जे दिव्यांग विद्यार्थी महापालिका शाळेत शिक्षण घेत असून , यापूर्वी या योजनेमधून ते वंचित आहे . त्यांनाही या वर्षात लाभ मिळवून देण्यात येणार आहे . कुणालाही वंचित ठेवण्यात येणार नाही .
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…