दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या

इयत्ता दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या
नाशिक ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , जुलै – ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ . 10 वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ . 12 वी ) पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल  www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर शुक्रवार , दि . 02 दुपारी 01.00 वाजता जाहीर करण्यात येणार आहे .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपूर , औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ .10 वी ) पुरवणी परीक्षा दि. 27 जुलै ते 12 ऑगस्ट व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ . 12 वी ) ची पुरवणी परीक्षा दि. 21 जुलै , ते 24 ऑगस्ट , या कालावधीत आयोजित करण्यात आली होती .
सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै – ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ .10 वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ . 12 वी ) पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकालwww.mahresult.nic.in या संकेतस्थळावर शुक्रवार , दि . 02 / 0 9 / 2022 रोजी दुपारी 01.00 वाजता जाहीर करण्यात येत आहे .
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत ( प्रिंट आउट ) घेता येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *