महाराष्ट्र

या तारखांना होणार दहावी बारावीच्या परीक्षा

  • विद्यार्थ्यांनो लागा तयारीला
    दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर
    नाशिक : प्रतिनिधी
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीत तर, दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे.
    फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार्‍या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत, याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिली आहे.
    इयत्ता 10 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी, 2024  ते गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 व इयत्ता 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी, 2024 ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
Devyani Sonar

Recent Posts

मालेगावच्या त्या हॉटेलमध्ये भाजीत आढळले झुरळ

नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…

4 hours ago

न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल, या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून

न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…

5 hours ago

नर्मदे हर

नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…

7 hours ago

संकोच

*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…

8 hours ago

बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!

*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718   लोकशाही प्रणालीत…

8 hours ago

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द, नेमके काय कारण घडले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…

8 hours ago