नाशिक

नाशिक विभागात कडक देखरेखीत दहावीची परीक्षा

493 केंद्रे, 458 ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा

नाशिक ः प्रतिनिधी
फेब्रुवारी, मार्च 2026 मध्ये होणार्‍या इयत्ता दहावीच्या परीक्षांदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नाशिक विभागात कडक उपाययोजना राबवण्यात येणार असून, एकूण 493 परीक्षा केंद्रांपैकी 458 केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र कस्टडी कार्यालये, तसेच उपद्रवी केंद्रांवर विशेष पथकांची तैनाती करण्यात येणार असल्याची माहिती
देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, नाशिक विभागीय मंडळांतर्गत नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये यंदा दहावीची परीक्षा होणार आहे. यासाठी एकूण 493 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी 35 केंद्रांवर अद्याप सीसीटीव्ही व्यवस्था उपलब्ध नाही.
जिल्हानिहाय सीसीटीव्ही केंद्रांची स्थिती अशी आहे :
नाशिक जिल्ह्यातील 224 पैकी 202 केंद्रांवर सीसीटीव्ही असून, 22 केंद्रांवर ही व्यवस्था नाही. धुळे जिल्ह्यातील सर्व 72 केंद्रे सीसीटीव्हीखाली असतील. जळगाव जिल्ह्यात 147 पैकी 134 केंद्रांवर सीसीटीव्ही असून, 13 केंद्रे विनासीसीटीव्ही आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व 50 केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे.
दरम्यान, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आणि साठवणीसाठी विभागात एकूण 60 परिरक्षक (कस्टडी) कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. त्यामध्ये नाशिकमध्ये 26, जळगावमध्ये 18, तर धुळे आणि नंदुरबारमध्ये प्रत्येकी 8 कस्टडी कार्यालयांचा समावेश आहे.
परीक्षा कालावधीत गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्हीद्वारे सतत निरीक्षण, भरारी पथकांची तैनाती आणि उपद्रवी केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

उपद्रवी परीक्षा केंद्रांची यादीही जाहीर

परिशिष्ट ‘अ’नुसार नाशिक विभागातील काही परीक्षा केंद्रे यंदा उपद्रवी म्हणून घोषित करण्यात आली आहेत. नाशिक जिल्ह्यातील केंद्र क्रमांक 1460 (माध्यमिक आश्रमशाळा, चिंचवड, ता. त्र्यंबकेश्वर) आणि केंद्र क्रमांक 1490 (धैर्यशीलराव पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बोरगाव, ता. सुरगाणा) तसेच नंदुरबार जिल्ह्यातील केंद्र क्रमांक 2205 (एस. ए. मिशन हायस्कूल, नंदुरबार) यांचा त्यामध्ये समावेश आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यात यंदा एकही उपद्रवी केंद्र घोषित करण्यात आलेले नाही.

10th class exam under strict supervision in Nashik division

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago