नाशिक : प्रतिनिधी
आज राज्यात दहावी माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवार (दि2) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.
नाशिक विभागात एकूण 1 लाख 97 हजार 234 विद्यार्थ्यांनी 456 परिक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा दिली. नाशिक विभागात नाशिक,जळगाव,नं
दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता होती. मात्र, आज शुक्रवार दि.२ जून रोजी निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढता येणार आहे.
कुठे पाहाल निकाल?
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल