मुख्य संशयितांचा शोध सुरूच; पंचवटी, भद्रकाली पोलीस व गुंडाविरोधी पथकाची कामगिरी
पंचवटी : प्रतिनिधी
फुलेनगरमधील राहुलवाडी येथे सागर विठ्ठल जाधव याच्यावर गोळीबार करणार्या प्रतिस्पर्धी टोळीतील 11 जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पंचवटी पोलीस, भद्रकाली ठाण्यातील गुन्हेशोध पथक व गुंडाविरोधी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. प्रत्यक्ष गोळीबार करणारे विकी उत्तम वाघ व विकास ऊर्फ विकी विनोद वाघ, अमोल पारे ऊर्फ बबल्या तसेच साथीदारांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, 17 सप्टेंबरला रात्री उशिरा फुलेनगरमधील राहुलवाडी येथे ओट्यावर बसलेला सागर विठ्ठल जाधव (वय 35) यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने विकी उत्तम वाघ व विकास ऊर्फ विकी विनोद वाघ व इतर साथीदार यांनी पूर्ववैमनस्य व वर्चस्ववादातून पिस्तुलातून गोळी झाडली होती. ही गोळी त्याच्या डाव्या डोळयाच्या खाली लागून तो गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासास प्रारंभ केला. हा गुन्हा संवेदनशील असल्याने, तसेच टोळीयुद्धाच्या अनुषंगाने पोलीस संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे, सहाय्यक आयुक्त संगीता निकम यांनी संशयित आरोपींचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथक, भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथक व गुंड विरोधी पथक यांची वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली होती.
या पथकांनी मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी वैशालीनगर, नवनाथनगर, वज्रेश्वरी व फुलेनगर परिसरात लपून बसल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे सापळा लावून एकूण 11 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
त्यांची नावे नीलेश बाळ पवार (वय 27, रा. राजेय अर्पा. विंग नं. 4, फ्लॅट नं. 13, मेहेरधाम, म्हसरूळ), आकाश राहुल निकम (24, रा. राजेय अर्पा., विंग नं. 4, फ्लॅट नं. 9, मेहेरधाम, म्हसरूळ), रोशन राजेंद्र आहिरे (वय 30, रा. प्लॉट नं. 7, कर्णनगर, पेठरोड), सचिन मोतीराम गांगुर्डे (वय 21, रा. गजानन चौक,
फुलेनगर), इरफान सागिर खाटिक (वय 44, रा. जयवंत सोसायटी, सावरकर गार्डनजवळ, आकाश पेट्रोलपंपाजवळ, म्हसरूळ), आकाश ऊर्फ बंटी राजेंद्र दोंदे (वय 30, रा. पालिका बाजारासमोर, बुद्धविहाराशेजारी, शनि मंदिराजवळ, पेठरोड), आदित्य दिनेश आहिरे (वय 22, रा. गोविंदा बी, फ्लॅट नं. 6, शिंदेनगर, मखमलाबाद रोड), नितीन रमेश खलमे (वय 32, रा. वैशालीनगर, पंचवटी), साहिल फिरोज शेख, वय 21, रा. वैशालीनगर, पंचवटी), भारत मुकुंद कंकाळ (वय 25, रा. राजेय सोसायटी, फ्लॅट नं. 19, मेहरधाम), योगेश भीमराव जाधव (वय 29, रा. गल्ली क्र. 3, राहुलवाडी, पेठरोड, नाशिक).
वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र आर. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पवार, गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सतीश शिरसाठ व पथक, भद्रकाली पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार व पथक तसेच गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकाने ही कामगिरी बजावली आहे.
अवैध शस्त्रांविरोधात कोम्बिंग मोहीम राबवणार
फुलेनगर परिसरात झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सागर जाधव याच्यावर हल्ला करण्यासाठी जुनी पार्श्वभूमी असल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी हल्ला केला ते मुख्य आरोपी फरार असून, त्यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. परंतु याच प्रकरणातील
11 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. मुख्य आरोपींकडे पिस्टल कोणाकडून आले, त्यांना पिस्टल पुरवणारे कोण आहेत? त्यांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल. अवैध शस्त्रांविरोधात लवकरच कोम्बिंग मोहीम राबविणार येणार आहे .
– किशोर काळे, पोलीस उपायुक्त
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…