नाशिक

अवकाळीमुळे जिल्ह्यात 1,110 घरांचे नुकसान

नुकसानग्रस्तांसाठी 47 लाख अनुदानाची मागणी

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे एक हजार 110 घरांची अंशत: पडझड झाली आहे. नुकसानग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे 47 लाख रुपये अनुदानाची मागणी
केली आहे.
जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गारपीट व वादळी वार्‍यासह काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. त्यामुळे ग्रामीण भागात विशेषत: आदिवासीबहुल तालुक्यांत घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. नैसर्गिक आपत्तीमध्ये पडझड होणार्‍या घरांकरिता संबंधित कुटुंबांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येते. जिल्ह्यात 1 ते 31 मे या कालावधीत एक हजार सहा कच्च्या घरांची, तर 104 पक्क्या घरांची अंशत: पडझड झाली आहे. कच्च्या घरांचे नुकसान झालेल्या 1,006 कुटुंबांकरिता 40 लाख 24 हजार रुपये, तर पक्क्या घरांचे नुकसान झालेल्या 104 कुटुंबांकरिता सहा लाख 76 हजार रुपये मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे, असे एकूण 47 लाख रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. याशिवाय, जिल्ह्यात सुरगाणा व बागलाणमध्ये प्रत्येकी एका घराची पूर्णत: पडझड झाली आहे. त्याच्या मदतीपोटी संबंधित दोन कुटुंबांना देण्याकरिता अडीच लाखांंचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

2 days ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

2 days ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

2 days ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

2 days ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

2 days ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

2 days ago