पाडळी देशमुख रेल्वे पुलाखाली पाणी तुंबल्याने पाडळी देशमुखसह १२ वाड्या व शालेय विद्यार्थ्यांना रस्ता बंद
■ रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी
मुकणे : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात काल शनिवार दिनांक ३ पासुन सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे महामार्गानजीकच्या पाडळी देशमुख गावाकडे जाणाऱ्या रेल्वेपुलाखालील पाणी निघत नसल्याने पाडळी देशमुख गावचा व पुढे जाणाऱ्या शेणवड खुर्द, गरुडेश्वर व १२ वाड्या तसेच पंचक्रोशीतील गावांचा व मुकणे येथे शाळेत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक-मुंबई महामार्गानजीकच्या पाडळी देशमुख येथील रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले मात्र येथे येणाऱ्या पाण्याला निघण्यासाठी अगदी छोटी मोरी टाकल्याने बाहेरून येणारे पाणी निघत नाही परिणामी येथे पाण्याचा तुंब बसुन पुलाच्या दोनही बाजुपर्यंत पाणी पांगल्याने पायी जाणे तर सोडा वाहनधारकांनाही मोठी कसरत करावी लागत असुन अनेक वाहने रस्त्याच्या बाजूला लाऊन दिले जात आहे. यामुळे पाडळी देशमुख गावकऱ्यांस व पुढे जाणाऱ्या शेणवड खुर्द, गरुडेश्वर व १२ वाड्या तसेच पंचक्रोशीतील गावांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मुकणे येथे शाळेत जाणाऱ्या गावांतील शालेय विद्यार्थ्यांचा जाण्या-येण्याचा प्रश्न निर्माण झाला असुन रेल्वे प्रशासनाने येथील मोरी काढुन पाणी निघण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी इगतपुरी खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष जयराम धांडे, सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, महेश धांडे, रतन धांडे, दिनेश धोंगडे, रामभाऊ धोंगडे, बाळासाहेब धांडे, नितीन धांडे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली .
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…