जि.प.च्या शिक्षण विभागाकडून जाहीर
नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील बारा शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले असून त्या मान्यतेशिवाय सुरू असल्याचे म्हटले आहे . यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळांमध्ये प्रवेश देताना संबंधित शाळेला मान्यता आहे किंवा नाही याची शहनिशा करूनच प्रवेश घ्यावा , असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे .
दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व तालुकास्तरांवरून त्या त्या तालुक्यांमधील मान्यता नसतानाही सुरू असलेल्या शाळांची माहिती मागवली होती . यात नाशिक जिल्ह्यात १२ शाळा विना परवानगी सुरू असल्याचे
प्रवेश घेताना चौकशी करावी
कळवले आहे . बागलाण , दिंडोरी , चांदवड , देवळा , इगतपुरी , कळवण , मालेगाव , नाशिक , नांदगाव , निफाड , पेठ , सिन्नर , मान्यता पेठ , सिन्नर , सुरगाणा , पेठ , त्र्यंबकेश्वर व येवला येथील गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अहवालातून या शाळा समोर आल्या आहेत .
प्रवेश घेताना चौकशी करावी
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली असून , पालकांनी पाल्यांचा प्रवेश घेताना शाळांना मान्यता नसल्यास प्रवेश घेऊन पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे , असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे .
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…