निफाड:
आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल दिला नाही या कारणाने नैताळे येथील ऋषिकेश जालिंदर सुरासे या इयत्ता 6 वी मध्ये शिकणाऱ्या 12 वर्षाच्या मुलाने घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे . या बाबत अधिक माहिती अशी की , नैताळे येथील आदिवासी वस्तीमध्ये जालिंदर सुरासे व पत्नी भारती सुरासे आपल्या दोन मुलांसमावेत राहतात . ते मोलमजुरी करून कुटुंबाचे पालन पोषण करतात त्यांचा एक मुलगा इयत्ता सहावी तर दुसरा इयत्ता तिसरीत प्राथमिक विद्यामंदिर नैताळे या नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो . त्यातील इयत्ता 6 वी मध्ये शिकत असलेला 12 वर्ष वयाच्या ऋषिकेशने आई भारती यांच्याकडे गेम खेळण्यासाठी मोबाइल मागितला .मात्र मोबाइल न देता अभ्यास कर असे सांगितले. त्यानंतर त्या बाजारात गेल्या . मात्र त्या घरी आल्या तेव्हा त्यांना ऋषिकेश ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसला . घटनेची माहिती कुटुंबाने निफाड पोलिसांना दिली . पोलिसानी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली . निफाड येथे विच्छेदनानंतर ऋषिकेशचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला . पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देशमुख करीत आहेत .
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…