नाशिक विभागात वर्षभरात  125 लाचखोर जाळ्यात

 

पोलीस खात्यात सर्वाधीक लाचखोर,   महसूल दुसऱ्या स्थानी

नाशिक: प्रतिनिधी

 

सातव्या वेतन आयोगामुळे घसघशीत झालेला पगार, सरकारी नोकरीमुळे मिळणार्‍या इतर सुविधा अशी सारी परिस्थिती असूनही सरकारी काम करणार्‍यांची लाचखोरी थांबलेली नाही, सरत्या वर्षात लाचलुचपत प्रतिबांधाक वभागाने केलेल्या कारवाईत 125 अधिकारी, कर्मचारी लाच घेताना जाळ्यात अडकले, यात पोलीस विभागातील कर्मचारी सर्वांत जास्त तर त्याखालोखाल महसुलच्या कर्मचार्‍याचा लाच घेण्यात वरचा क्रमांक लागतो,

 

नाशिक,नगर,धुळे,नंदुरबार,जळगाव विभागातील वर्ग दोन,तीन क्लर्क,शिपाई,  लोकसेवक,इतर लोकसेवक,सरकारी लोकसेवकांचे खासगी व्यक्तींचे प्रमाण जास्त आहे.

पोलिस,महसूल,जिल्हा परिषद, भूमी अभिलेख,पंचायत समिती,कृषी विभाग,वनविभाग,महानगरपालिका,पाटबंधारे,आरोग्य विभाग,सहकार,परिवहन (आरटीओ),आदिवासी विकास विभाग,शिक्षण विभाग अशा एकूण पंचेचाळीस विभागात लाचखोर आढळून आले.

 

खड्डा चिकनची शहरात वाढती क्रेझ

 

 

 जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत १२५ सापळ्यांमध्ये १७५ लाचखोरांना पकडले आहे. त्यात सर्वाधिक लाचखोरीच्या कारवाया पोलिस विभागात झाल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पोलिस विभागात ३०, महसूल विभागात २१, जिल्हा परिषद, पंचायत समिती १५, महावितरण कंपनीत १०, शिक्षण विभागात चार, आदिवासी विकास विभागात चार सापळे रचून लाचखोरांना पकडले आहे. तर नऊ खासगी व्यक्तींनाही लाच घेताना किंवा मागताना पकडले आहे. त्याचप्रमाणे चार अन्य भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले असून, त्यात १४ शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनुसार, परिक्षेत्रात पकडलेल्या लाचखोरांमध्ये सर्वाधिक ९२ लाचखोर वर्ग तीनमधील आहेत. त्या खालोखाल वर्ग दोनमधील २५ अधिकारी लाचखोर होते. तर वर्ग एक व चारमध्ये प्रत्येकी १०-१० लाचखोर अधिकारी व कर्मचारी आहेत. तसेच इतर ३८ लोकसेवक व खासगी व्यक्ती लाच घेताना किंवा मागताना जाळ्यात सापडले आहेत.
 नंदुरबार येथे मार्च महिन्यात महसूल विभागातील उपविभागीय अभियंता, सहायक अभियंता व खासगी व्यक्तीस चार लाख रुपयांची लाच घेताना पकडले.

नागरिकांच्या अडलेल्या शासकीय कामांसाठी चिरीमिरी किंवा मोठी रक्कम देऊन कामे मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच मागीतली जाते. बर्‌याचदा लाच देऊनही काम न झाल्याने वैतागलेला तक्रारदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जातो. त्यानंतर सापळे रचले जातात. योग्य पुरावे आणि साक्षीदारांच्या समक्ष हा सापळा लावून लाच घेणार्‌याला रंगेहाथ पकडले जाते.त्यानंतर पुढील कारवाई केली जाते.

 

 

नाशकात कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र

 

 

असे लाचखोर

विभाग।        कारवाई

पोलीस          30

महसूल।          21

जिलपरिषद।   15

महावितरण।    10

शिक्षण।            4

आदिवासी।        4

 

खासगी व्यक्ती।   9

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *