नाशिक :
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात पाच उपशिक्षणाधिकाऱ्यांसह १७ गट शिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त असताना अवघ्या तिघांचीच नियुक्ती झाली आहे. रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येवला पंचायत समिती येथे गट शिक्षणाधिकारी म्हणून अमरावती येथील सय्यद गजनकर अली यांची नियुक्ती झाली आहे. तर सुरगाणा येथे संजयकुमार किसर सरवदे यांची औरंगाबाद येथून बदली झाली आहे. मालेगावला गटशिक्षणाधिकारी म्हणून मदन मोरे हे अमरावती येथून बदलून आले आहे.जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या एकूण १७ जागा रिक्त असताना केवळ तीनच अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. उर्वरित १४ जागा केव्हा भरल्या जाणार याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागून आहे. साडेपाच महिन्यांनंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून भगवान फुलारी यांची नियुक्ती झाली. त्यामुळे शिक्षण विभागातील रिक्त जागांचा प्रश्न हळूहळू मार्गी लागत आहे. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने २९ डिसेंबर २०२२ रोजी बदल्यांचे शिक्षण विभागातील गट – ब संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे आदेश दिले. यात राज्यातील १०५ उपशिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे... नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल नाशिकरोड :…
एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन नाशिक :- एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी…
गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सबसे कातील अशी ही नृत्यांगना…
भारतीय संविधानाची सखोल माहिती देणारा अनिल कुमार जवादे आणि ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि…
दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या रुममधे सिलेंडरमधील…