मद्यविक्रीमुळे 14 हजार कोटीचा महसूल
मुंबई
कोरोनाचे संकट गेल्यानंतर आता आर्थिक गाडा पूर्वपदावर आल्याने चालू वर्षामध्ये मद्याच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत देखील मोठीच भर पडली आहे. सध्या मद्य विक्रीतून मिळणार्या महसुलात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.मागील 9 महिन्यात 14,480 कोटींचा महसूल मिळाला आहे.
कोरोनाकाळात राज्यात लॉकडाउन लागू झाल्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यात मद्यविक्रीला देखील फटका बसला. कोरोना निर्बंध शिथील केल्यानंतर मद्य विक्री सुरू झाली होती. मात्र, आता कोरोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्यामुळे मद्यविक्रीदेखील जोमाने वाढली आहे.
गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 34.5 कोटी लिटर देशी मद्याची विक्री नोंदवण्यात आली. तर,2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात राज्यात 25 कोटी लिटर मद्य विकले गेले होते. तर, सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 23.5 कोटी लिटर विदेशी मद्याची विक्री झाली. वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात 17.5 कोटी लिटर विदेशी मद्य विकले गेले.
कोरोना महासाथीच्या काळात बीअरची विक्री मोठ्या प्रमाणात घटली होती. अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत सुरू होत असताना दुसरीकडे बीअरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या महिन्याच्या कालावधीत 23 कोटी लिटर बीअरची विक्री झाल्याची नोंद आहे. तर, 2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात 21 कोटी लिटर बीअरची विक्री झाली होती.
उच्चभ्रू वर्गाची पसंती असणार्या वाइनची मागणी देखील वाढत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या आठ महिन्याच्या या कालावधीत राज्यात 88 लाख लिटर वाइनची विक्री झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात 66 लाख लिटर वाइन विकली गेली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात वाइन विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.