सिन्नर : प्रतिनिधी
सोलापूर येथून गुजरात राज्यातील अहमदाबादकडे तांदूळ घेऊन जाणारा 14 टायर ट्रक
(एमएच 13-सीयू 6045) सिन्नर तालुक्यातील मोहदरी घाटात शनिवारी (दि.28) पहाटे पाचच्या सुमारास पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील मोठ्या प्रमाणात तांदूळ रस्त्यावर सांडला. या तांदळाचा संबंध सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (रेशन) धान्याशी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
अपघातानंतर बराच वेळ या घटनेची अधिकृत नोंद झाली नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले. दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रस्त्यावर सांडलेला तांदूळ पाहून तो रेशनचा असण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी मुसळगाव एमआयडीसी पोलिसांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पंचनाम्यात ‘रेशन तांदूळ’
असल्याचा प्राथमिक निष्कर्ष
या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून आणि मुसळगाव पोलिसांकडून लेखी पत्र देण्यात आले होते. त्यानंतर देशमुख यांनी संध्याकाळी पाचच्या सुमारास पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक जमधडे यांना घटनास्थळी पाठवले. जमधडे यांनी केलेल्या पाहणी व पंचनाम्यात प्रथमदर्शनी हा तांदूळ रेशनचा असल्याचे आढळून आले. काही गोण्यांवर एफसीआय (भारतीय अन्न महामंडळ)चे बारदान असल्याचेही निदर्शनास आले आहे. तांदळाचे वजन अंदाजे 25 टन असल्याचे समजते.
ट्रकचा चालक किरण सीताराम खांडेकर व क्लीनर नवनाथ ज्ञानू चव्हाण यांनी या मालाचा मालक कोण आहे, याची माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. कागदोपत्री अपघातग्रस्त ट्रकचा मालक राजू संभाजी लवटे असल्याचे समजते.
या पाहणीदरम्यान अन्न महामंडळाचा टॅग असलेले बारदानातील तांदूळ, प्लास्टिक गोण्यांमध्ये तसेच पिशव्यांमध्ये भरलेला तांदूळ आढळून आला. चालकाकडील बिले पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतली आहेत. चालकाने हा तांदूळ सोलापूरहून गुजरातमध्ये नेण्यात येत असल्याचे सांगितले. दरम्यान, पुरवठा निरीक्षण अधिकार्यांच्या अहवालानंतर पोलिस नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशातील जवळपास प्रत्येक राज्यात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्वतंत्र गोदामे असताना सोलापूरहून हा तांदूळ गुजरातमधील अहमदाबादकडे का नेला जात होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या तांदळाचा प्रवास आणि त्यामागील साखळीबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
14 tire truck overturned in Mohdari Ghat
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…
नाशिक : प्रतिनिधी समांतर गंगापूर रोड अर्थात स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग या महत्त्वाकांक्षी…
दि. 25 ते 31 ऑक्टोबर 2026 मेष : जबाबदार्या वाढतील या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन…
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…