नाशिक : प्रतिनिधी
मेनराेडवर दंगा घडविणाऱ्या दाेन्ही गटातील मुख्य संशयितांयह 14 तरुणांना अटक करण्यात अाली आहे. पाेलिसांनी मंगळवारी दुपारी संशयितांना मेनराेडला नेत गुन्ह्याचा पंचनामा करुन त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यामुळे व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.
भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार आणि निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या पथकाने मंगळवारी या गुंडांना दहिपुल परिसरात नेले. तिथे या संशयितांकडे धमकी, हाणामाऱ्या, तोडफोड केल्याप्रकरणी आॅनस्पाॅट चाैेकशी केली. पोलिसांच्या गराड्यात दोन्ही टोळक्यांना आणल्यावर परिसरातील दुकानदार व नागरिकांची गर्दी केली हाेती. गुंडांच्या वसुलीतला वर्चस्ववाद मिटवण्याची अपेक्षा नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. दंगा व प्राणघातक हल्ला प्रकरणात ऋषिकेश किरण खैरे, सुशिल उर्फ हेमराज गायकवाड या मुख्य संशयितांसह 14 जणांना अटक झाली आहे.