सटाणा ः प्रतिनिधी
पिंगळवाडे येथील वाघदर शिवारात राहणार्या पंधरा वर्षीय मुलाला अज्ञात इसमाने काहीतरी कारणाने पारसमणी रोडलाइन्स नाव असलेल्या कंटेनरमध्ये बसून पळून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय भामरे यांचा मुलगा ओम संजय भामरे यास घरी ठेवून बाहेरगावी गेले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेला संजय भामरे यांच्या आईने मोबाइलवर फोन करून कळवले की ओम घरी नाही. त्यानंतर भामरे यांनी मित्रांकडे विचारपूस केली असता सगळ्यांनी ओम आमच्याकडे आलाच नाही, असे सांगितले, त्यानंतर संजय भामरे शोध घेऊ लागले. शोध घेताना हॉटेल शाहू व तेथील पेट्रोलपंपावर गेले असता पेट्रोलपंपाचे पाठीमागे मुलगा ओमची सायकल दिसून आली. पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यात ओम भामरे, पारसमणी रोडलाइन्स नाव असलेले कंटेनरमध्ये बसून जाताना दिसून आले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…