संत निवृत्तीनाथाच्या यात्रेसाठी 150 जादा बसेस
नाशिक ः प्रतिनिधी
त्रंबकनगरीत संत निवृत्तीनाथांच्या यात्रेनिमित्त भाविकंासाठी 150 बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.त्यामुळे त्रंबकनगरीत येण्यासाठी भाविक,प्रवाशांची सोय होणार आहे.एकादशी आणि द्वादशी दिवशी जादा गर्दी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने दि.18 आणि 19 तारखेला दोन दिवस जादा बसेस सोडण्यात येणार आहे.
दि.16 ते 20 जानेवारी दरम्यान त्रंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा होत आहे.या यात्रेसाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातून दिंड्या आणि वारकरी येत आहेत.तीन लाखांहून अधिक वारकरी,भाविक त्रंबकेश्वरला येण्याचा अंदाज प्रशासनाकडून करण्यात आला आहे.त्यामुळे यात्रोत्सवात बुधवार गुरूवार (दि.18 आणि 19) या दोन मुख्य दिवशी जादा बसेस सोडण्यात येणार आहे.
जादा बसेसमुळे प्रवाशी भाविकांची सोय होणार आहे.जादा बसेसच्या माध्यमातून एस.टीच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
शहराच्या प्रवेशद्वारांवर जिल्ह्यासह राज्यातून विविध मानाच्या आणि लहानमोठ्या पालख्यांचे आगमन होत आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…