नाशिक

ओझरला महिनाभरात 150 नळकनेक्शन खंडित

नगरपरिषदेतर्फे मालमत्ता, पाणीपट्टी थकबाकी वसुली मोहीम

ओझर : वार्ताहर
ओझर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांकडे असलेल्या मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी ओझर नगरपरिषदेतर्फे सक्त वसुली मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत धडक कारवाईत महिनाभरात 150 नळकनेक्शन खंडित केले असून, पाच गाळेही सील केले आहे.
मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च 2026 च्या धर्तीवर ओझर नगरपरिषदेमार्फत मालमत्ता कर व पाणीपट्टी व गाळा भाडेच्या थकबाकीकरिता कार्यालयीन अधिकारी-कर्मचार्‍यांचे तीन पथके बनवून सक्त वसुली मोहीम राबवण्यात आली. नगरपरिषदेतर्फे थकीत मालमत्ता पाणीपट्टी व इतर कर भरण्यासाठी घंटागाडी, रिक्षाद्वारे, कार्यालयीन नोटीसद्वारे सूचित करण्यात येत आहे. सदर वसुली मोहीम व कारवाई ही मार्च 2026 अखेरपर्यंत सुरू राहील. मोहिमेंतर्गत थकबाकीदारांचे नळकनेक्शन कट करणे, मिळकतीवर बोजा चढवणे, जप्तीची कारवाई करणे, तसेच थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात व चौकाचौकात बोर्ड बॅनरद्वारे प्रदर्शित करण्याची कारवाई व गाळा भाडे थकबाकीपोटी गाळा सील करणे अथवा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे सांगून घरपट्टी, पाणीपट्टी व इतर थकीत करांचा तत्काळ भरणा करावा व कटू कारवाई टाळावी. मालमत्ता करासाठी लागू असलेल्या अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी कर भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी देशमुख यांनी केले आहे.

150 water connections disconnected in Ozark in a month

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago