‘गिरणा’तून चाळीसगाव औद्योगिक वसाहतीसाठी 1500 क्यूसेक विसर्ग

पळाशी : वार्ताहर
नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणातून चाळीसगाव औद्योगिक वसाहतीची तहान भागविण्यासाठी 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग 11 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता सोडण्यात आला. बिगर सिंचन वापरायच्या पिण्याच्या पाण्यासाठी 1500 क्यूसेक विसर्ग गिरणा धरणातून सोडण्यात आला आहे.
गिरणा धरण पात्राच्या नदी काठी असणार्‍या नागरिकांनी गिरणा पात्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्याने, चाळीसगाव औद्योगिक वसाहतीत पिण्याच्या पाण्याची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपले तरी पुरेसा पाऊस नसल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. चाळीसगाव तालुक्यासह निम्म्या जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीचे पात्रदेखील कोरडे पडले आहे.
पावसाळ्यात पाणीबाणीचे संकट कोसळल्याने गिरणा धरणातून काल सोमवारी सकाळी 6 वाजता चाळीसगाव औद्योगिक वसाहतीची तहान भागवण्यासाठी बिगर सिंचन पाणी वापराचे 1500 क्यूसेक आवर्तन सोडण्यात आले. पाण्याचे हे आवर्तन केवळ गिरणा धरण ते चाळीसगाव तालुक्यातील जामदा बंधार्‍यापर्यंतच असणार आहे. गिरणा धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाण्याची तहान भागवण्यासाठी ऑगस्टमध्ये धरणातून आवर्तन सोडावे लागले आहे. जिल्हाधिकारी जळगाव कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांनी दिलेल्या आदेशानुसार 1500 क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.
गिरणा धरणातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ धुळे अंतर्गत असलेल्या चाळीसगाव एमआयडीसाठी गिरणा धरणातून काल सोमवारी 1500 क्यूसेक आवर्तन सोडण्यात आले आहे. पाणी सोडण्यात आल्याने गिरणा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे अभियंता, पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव यांनी केले आहे. ऑगस्टमध्ये पहिल्यांदा आवर्तन सोडण्यात आले.
नाशिक जिल्ह्यात गेल्या जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणाच्या उगम स्थानावरील जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाल्याने या धरणांचा विसर्ग गिरणा धरणात
येऊ लागला. परिणामी, जूनमध्ये 21 टक्के पाणीसाठा असलेल्या गिरणा जलसाठा आजच्या तारखेला 66.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचे अद्याप दोन महिने पाहता यंदाही गिरणा धरण सलग दुसर्‍या वर्षी 100 टक्के भरले, मात्र चाळीसगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून काही पाऊस झाला नसल्याने गिरणा नदीचे पात्र कोरडेठाक होत आहे.
जामदा बंधार्‍यातील जलस्रोत आटले आहे. परिणामी, अवलंबून असलेल्या चाळीसगाव एमआयडीसीला पाणीबाणी स्थिती निर्माण झाली. परिणामी, गिरणा धरणातून भर पावसाळ्यात बिगर सिंचनाचे आवर्तन सोडावे लागले. या आवर्तनामुळे एमआयडीसीची तहान भागणार असून, गिरणा धरण ते जामदा बंधार्‍यापर्यंत असलेल्या गिरणा काठावरील गावे तसेच पाणीपुरवठा योजनांना देखील आपसूक फायदा होणार आहे. 1969 मध्ये गिरणा धरणाचे लोकार्पण झाल्यावर या धरणातून पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये पाणी सोडावे
लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *