महाराष्ट्र

नाशिक विभागात अबतक 154

महसूल, पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर
नाशिक  ः देवयानी सोनार
सरकारी कामासाठी अधिकार्‍यांकडून सामान्य माणसांची नेहमीच पिळवणूक होत असते. त्यातून मग काम करुन घेण्यासाठी अधिकारी, कर्मचारी चिरीमिरीची अपेक्षा करतात. नागरिकही काम वेळेत होण्यासाठी पैसे देण्यास तयार होतात. मात्र, अनेकजण लाच लुचपत विभागाकडे तक्रारी करतात. त्यातून हे लाचखोर जाळ्यात सापडतात. नाशिक विभागात गेल्या वर्षभरात 154 सापळे यशस्वी झाले. विशेष म्हणजे या लाचखोरांमध्ये जिल्हा निबंधकांपासून तर शिक्षणाधिकारी पर्यंतच्या अधिकार्‍यांचा सहभाग आढळून आला.

त्र्यंबकला बेल वन उद्यानासाठी मिळेना जागा!

सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण खरोखरच नागरिकांना अनुभवण्यास येते.  कायदेशीर काम करवून घेण्यासाठीची यंत्रणा चिरीमिरीसह मोठमोठे घबाड मिळविण्यात माहिर झाल्याचेच चित्र आकडेवारीहून दिसून येत आहे.वर्ग एक ते वर्ग चारचे अधिकारी कर्मचार्‍यांनाही वरकमाईचा मोह आवरत नाही .जिथे न्यायदानाचे कामकाज चालते अशा जिल्हा न्यायालय ठिकाणीही वर्ग तीन,चार आणि कनिष्टांनाही चिरीमिरीशिवाय त्यांचे पान हलत नसल्याचे चित्र आहे.

 

लासलगावी पुन्हा कांद्याचे लिलाव बंद

 

नाशिकला  59 , अहमदनगर 33,धुळे 18,नंदूरबार 14,जळगाव30 असे एकूण 154 लाचखोर आढळून आले. नाशिक विभागात महसूल खाते 10 त्याखालोखाल पोलीस विभाग, जिल्हा परिषद 7, भुमि अभिलेख 5, सहकार 5  आदी विविध विभागांत कारवाई करण्यात आली.

 

भुरट्या चोरांचा शेतमजुरांच्या स्मार्टफोनवरच डल्ला

यामध्ये वर्ग तीनचे सर्वाधिक लाचखोर तर वर्ग 1,2 आणि इतर खासगी व्यक्तींचा नंबर लागतो.सर्वाधिक वर्ग3 चे 120 लाचखोर पकडण्यात आले.

 

मुंबई बॉम्ब स्फोटातील संशयितासोबत बडगुजरांचे फोटो व्हायरल

महसूल विभाग,जिल्हा न्यायालय परिसर,पोलिस,जि.प.,पंचायत समिती,भुमि अभिलेख,महानगरपालिका,आरोग्य विभाग,शिक्षण विभाग  आदींसह विविध 45 विभाग तसेच इतर आणि खासगी असे 47 प्रकारच्या विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांद्वारे लाच घेण्याच्या तक्रारी वाढत आहेत.
वर्षभरात 125 लाचखोर जाळ्यात सापडले होते. पोलिस खात्यातील लाचखोर सर्वाधिक होते.  यंदा लाचखोरीच्या बाबतील महसून विभाग अव्वल ठरला आहे. पोलिस विभाग त्याखालोखाल असून जिल्हा परिषद,भूमि अभिलेख आदी विभागातील अधिकारी कर्मचारी सापळ्यात अडकल्याचे चित्र आहे

 

व्हायलेन्स.. व्हायलेन्स.. व्हायलेन्स..!

 

लाचखोरांची कोटीच्या कोटी उड्डाणे
विभागात लाचखोरांना पकडल्यानंतर त्यांच्या मालमत्तेची घराची तपासणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली.या तपासणीत अनेक लाचखोरांकडे मोठी माया मिळून आली. लाचखोरांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेली आढळून आले. ही अपसंपदा जमा करण्यात येते

 

नाशिकमध्ये धनगर समाज विद्यार्थ्यांसाठी राज्यातील पहिले वसतिगृह

 

वर्ग तीनचे सर्वाधिक लाचखोर
लाचखोरांमध्ये वर्ग एक आणि वर्ग दोन पेक्षा वर्ग तीनचे कर्मचारी अधिक प्रमाणात लाच घेत असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होते. नाशिक विभागात वर्ग एकचे सहा, वर्ग दोनचे  12, वर्ग तीनचे 48 तर वर्ग चारचे अवघे पाच जण लाच घेताना आढळून आले. त्यात वर्ग तीनचेच सर्वाधिक लाचखोर असल्याचे सिद्ध होते.

वर्षभरात घरगुती हिंसेच्या तब्बल 856 तक्रारी !

 

खासगी व्यक्तींचाही वापर
लाचखोरीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांबरोबरच काहीजण खासगी व्यक्तींचाही वापर करुन घेताना दिसून येतात. 2 डिसेंबरपर्यंत एकूण 13 खासगी व्यक्तींना लाच घेताना पकडण्यात आले.अनेक अधिकारी व कर्मचारी लाच मागीतल्यानंतर ती स्वीकारण्यासाठी मध्यस्थ खासगी व्यक्तीचा उपयोग करुन घेतात. नाशिक विभागात गेल्या वर्षभरात 13 जणांना पथकाने पकडले.

महिला पर्यटन उद्योजिका साठी एमटीडीसी चे धोरण

महसूल विभाग अव्वल
लाचखोरीमध्ये महसूल विभागच सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याचे उघड झाले आहेत. त्याखालोखाल पोलीस खात्याचा क्रमांक लागतो. महसूल विभागात तलाठी, मंडल अधिकारी हे लाच घेताना पकडण्यात आले. असे दहा जण लाच घेताना जाळ्यात अडकले. तर पोलीस खात्यात आठ जणांना पकडण्यात आले आहे.

Devyani Sonar

Recent Posts

छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन*

*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…

27 minutes ago

संडे अँकर: कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका

कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

36 minutes ago

अखेर कृषिमंत्री कोकाटे यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी

नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…

45 minutes ago

पंचवटीतील पोलिसावर निलंबनाची कारवाई

अंमली पदार्थ विकणार्‍यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…

16 hours ago

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

2 days ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

3 days ago