नाशिक

लोकअदालतीत 16 हजार 826 प्रकरणे निकाली

तब्बल 86 कोटींवर तडजोड शुल्क वसूल

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात 14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण 16 हजार 826 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे 86 कोटी 94 लाख 89 हजार 133 रुपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुहास भोसले यांनी दिली.
राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण 55 पॅनलवर प्रलंबित 32 हजार 975 तर दाखल पूर्व 80 हजार 267 इतकी प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी 4 हजार 159 प्रलंबित प्रकरणे तर 12 हजार 667 इतकी दाखल पूर्व प्रकरणे एकाच दिवशी लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली निघाली.

40 दांपत्यांचे फुलले संसार

लोकअदालतीत कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये एकूण 3 हजार 173 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी 40 प्रकरणांमध्ये आपसी समझोत्याने वाद मिटून दांपत्यांचे वैवाहिक जीवन पूर्ववत झाले.

निकाली निघालेली प्रकरणे दृष्टिक्षेपात
मोटार अपघात –                      273 प्रकरणे
कामगारविषयक –                   6 प्रकरणे
कौटुंबिक वादातील प्रकरणे –    40 प्रकरणे
फौजदारी तडजोड –                 225 प्रकरणे
इतर –                                   15141 प्रकरणे

मोटार अपघात प्रकरणे

1. मोटार अपघात प्रकरणात 9 जानेवारी 2022 मध्ये मोटार सायकल व ट्रकमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या मोटारसायकलस्वाराच्या वारसांना अपघात नुकसानभरपाई प्रकरणात तडजोड होऊन रूपये 73 लाख इतकी नुकसानभरपाई मिळाली. मयत संतोष जाधव हे मोटारसायकलीने जात असताना मिर्ची हॉटेलकडून सूरतकडे भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकच्या धडकेत जबर मार लागून अपघातात मरण पावले. पक्षकारांच्या परस्पर सहमतीने रुपये 73 लाख रकमेत तडजोड होऊन प्रकरण लोकअदालतीत निकाली काढण्यात आले. जिल्हाभरात अशी एकूण 273 मोटार वाहन अपघात प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
2. मोटार अपघात प्रकरणांमध्ये 15 जुलै 2022 रोजी मयत पोलीस कॉन्स्टेबल मधुकर लक्ष्मण खुळे हे मोटारसायकलने सिन्नरकडून पांढुर्ली चौफुलीकडे येत असताना पिकअप जीपने दिलेल्या धडकीत ते मार लागून मयत झाले. या प्रकरणात पक्षकारांच्या परस्पर सहमतीने रुपये 46 लाख 50 हजार रकमेत तडजोड होऊन प्रकरण लोकअदालतीत निकाली काढण्यात आले.
3. मोटार अपघात प्रकरणांत 9 सप्टेंबर 2024 रोजी मोटारसायकल व क्रेनच्या अपघाातात सागर संपत कासार हे मयत झाले होते. या प्रकरणातही पक्षकारांच्या सहमतीने रुपये 42 लाख 30 हजार रकमेत तडजोड होऊन प्रकरण निकाली निघाले.
4. निफाड येथे अपघातात मयत झालेले योगेश सुखदेव शिंदे हे राजस्थानमधील जोधपूर येथे सैन्य दलात कार्यरत होते. वारसांनी प्राधिकरणाकडे नुकसानभरपाईसाठी केलेल्या दाव्यात समेट होऊन लष्करी जवानाच्या कुटुंबीयांना रुपये 1 कोटी 20 लाख रूपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय होऊन प्रकरण निकाली
काढण्यात आले.
5. अक्षय सुपेकर हे 23 जानेवारी 2022 रोजी मोटारसायकलवर बळी मंदिराकडून राजमाता मंगल कार्यालयाकडे जात असताना कारने धडक दिल्याने जखमी झाले होते. या अपघातात वाहन मालक व लिबर्टी इन्शुरन्स कंपनी यांच्याविरुद्ध केलेल्या दाव्याचे लोकअदालतीत तडजोड होऊन रुपये 94 लाख रुपयांची भरपाई सुपेकर यांना देण्यात आली.

16 thousand 826 cases disposed of in Lok Adalat

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago