सिमेंट मिक्सर  गाडीच्या धडकेने  १९ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यु

सिमेंट मिक्सर  गाडीच्या धडकेने  १९ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यु

सातपूर: प्रतिनिधी

सातपूर एम आय डी सी गजबजलेला परिसर आहे. आज दुपारी सिमेंट मिक्सर गाडीने दुचाकीला धडक बसल्याने 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

दुचाकीवरून दोन जण जात असताना मिक्सर गाडीने दुचाकीला धडक दिल्याने तेजस गंगाधर वनसे, वय १९ वर्ष हा हा बाँश कंपनी च्या रोड ने प्रबुद्ध नगर कडे जात असताना अपघात होऊन मृत्युमुखी पडला.

सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे”, असे अधिकाऱ्याने सांगितले. आजकाल हिट अँड रनच्या अपघातात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातूनही मोठ्या प्रमाणात वाहन चालविताना निष्काळजीपणा होतो आहे. अशावेळी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक झाल्याचे दिसून जरी येते असले तरी सिमेंट मिक्सर वाहन चालक अनेक वेळा जोरात गाडी चालवताना दिसतात त्यातून त्याच कंपनी सिमेंट मिक्सर ट्रकच्याच गाडीने अपघातात जीव गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.  दुचाकी चालक व कंपनी प्रशासनावर कारवाई ह्वावी असे नागरिकांचे म्हणणे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *