रात्री कचरा संकलनासाठी 20 घंटागाड्या रस्त्यावर 

 

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

नाशिक पालिकेने मंजूर केल्यानंतर अखेर 1 डिसेंबर पासून शहरात घंटाlगाडीचा नवीन ठेका सुरु झाला आहे.

 

विद्यमान ठेक्या लहानांसह मोठ्या गाड्या वाढल्या आहेत. त्यामुळे जेथे या गाड्या जात नव्हत्या तेथे आता घंटागाडी जात आहे. दरम्यान शहरातील सहा विभागात एकूण 20 ठिकाणी रात्रीच्या वेळी घंटागाडी सुरु करण्यात आल्या असून रात्री बारा वाजेपर्यंत व्यवसायिकांसाठी या घंटागाड्या फिरत आहे.

 

 

नव्या घंटागाडी ठेक्यासाठी महापालिकेने ३५६ कोटी मोजले आहे. दरम्यान नव्या घंटा गाडीच्या उंचीवरून देखील नवा वाद निर्माण झाला होता. शहरातील पंचवटीसह काही भागात महिलांना खुर्ची लावून घाण कचरा गाडी टाकावा लागत होता. याबाबत विविध राजकीय पक्षांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान महापालिका आयुक्तांनी स्वतः सकाळच्या वेळेला फिरून याबाबतची माहिती घेतली तसेच घंटागाड्यांवर अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची सूचना केली आहे. त्याचप्रमाणे आता ज्या घंटा गाड्या ंची उंची जास्त आहे त्यांना पायऱ्या बसवण्याची देखील तयारी सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे

 

1 डिसेंबर पासून नवीन घंटागाड्या रस्त्यावर धावत आहे. जुन्या घंटागाडी ठेक्यात गाड्यांची संख्या कमी होती. मात्र नवीन ठेक्यात छोटे व मोठे गाड्या मिळून 397 घंटा गाड्या विविध भागात फिरून कचरा संकलन करीत आहे. यामुळे दैनंदिन जमा होणाऱ्या कचऱ्यात सुमारे दहा टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर आता महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागात असलेल्या व्यवसाय प्रतिष्ठानच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेलाही घंटा गाड्या सुरू केले आहे. यामुळे नाशिकच्या विविध भागात स्वच्छता दिसून येणार आहे. घंटागाडीच्या नव्या ठेक्यात लहानांसह मोठ्या गाड्या देखील वाढल्या आहेत. संख्या वाढल्यामुळे ज्या ठिकाणी आतापर्यंत घंटागाडी पोहोचत नव्हती त्या ठिकाणी देखील गाडी जात आहे. तर शहरातील सहा विभागात मिळून सुमारे 20 ठिकाणी व्यवसायिक प्रतिष्ठान असलेल्या भागात सायंकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत घंटागाड्या फेऱ्या करीत असून घाण कचरा गोळा करीत आहे.

 

.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *