दहावी बारावी बोर्डाचे 2023 संभाव्य वेळापत्रक जाहीर

दहावी बारावी बोर्डाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
नाशिक: प्रतिनिधी
दहावी बारावी बोर्डाचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून आजपासून विद्यार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक पाहता येणार आहे अशी माहिती मंडळांने दिली आहे
http://www.mahahsscboard.in मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आजपासून वेळापत्रक पाहता येणार आहे
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी ची परीक्षा मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 23 मार्च दरम्यान
तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे मंडळाकडून कळवण्यात आलेले आहे
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नव विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखक परीक्षा संभाव्य कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत लेखी परीक्षा कालावधी सोमवार दिनांक 20 मार्च 2023 मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 ते माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांक निहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 19 सप्टेंबर पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 ते शनिवार दिनांक 25 मार्च 2023 शाळा कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेत प्रविष्ट व्हावे अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येणार आहे
या  वेळापत्रकांबाबत काही सूचना हरकती असल्यास त्या विभागीय मंडळांकडे तसेच राज्य मंडळांकडे पंधरा दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्या नंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *