निवडणूक प्रशिक्षणाला 248 अधिकार्‍यांची दांडी

निवडणूक अधिकार्‍यांचा कारवाईचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
निवडणूक प्रशिक्षणास विनापरवानगी गैरहजर कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत निवडणूक कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पहिले व दुसर्‍या टप्प्यातील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. दरम्यान, प्रशिक्षणाला गैरहजर अधिकार्‍यांवर कारवाईचा इशारा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिला आहे.
या प्रशिक्षणादरम्यान एकूण 248 अधिकारी विनापरवानगी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आलेे. निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची व कायदेशीर जबाबदारी आहे. निवडणूक प्रशिक्षणास विनापरवानगी अनुपस्थित राहणे हे लोकप्रतिनिधित्व अधिनिय 1951 चे कलम 134 अंतर्गत शिस्तभंगास पात्र ठरणारे कृत्य आहे. त्याअनुषंगाने, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित गैरहजर अधिकारी व कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यांच्यावर योग्य ती शिक्षा लावण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक मनपा सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली आहे. निवडणूक कामकाजात नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडून निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

248 officers deployed for election training

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *