25 सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

पोलीस आयुक्तालयाकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा वाढला वेग

सिडको/पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून परिमंडळ-1 अंतर्गत येणार्‍या 25 सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी नाशिक जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली. शहरातील सार्वजनिक शांतता कायम राहावी, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण व्हावे, तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आणि सातत्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार तडीपारी, एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धता तसेच संघटित गुन्हेगारीविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई केली जात आहे.

या अनुषंगाने परिमंडळ-1 च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा सविस्तर आढावा घेतला. अधिनस्त सहायक पोलीस आयुक्त व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महापालिका निवडणूक 2025-2026 ची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात
आला आहे.
पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, मुंबई नाका आणि सरकारवाडा या पोलीस ठाण्यांकडून प्राप्त हद्दपार प्रस्तावांची चौकशी करून एकूण 25 गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
याशिवाय, आणखी 20 गुन्हेगारांच्या हद्दपार प्रस्तावांची चौकशी सुरू असून, अंतिम अहवालानंतर त्यांच्याविरोधातही लवकरच कारवाई केली जाणार आहे.
नाशिक महापालिका निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात आणि खेळीमेळीने पार पडावी, यासाठी सराईत व संघटित गुन्हेगारी करणार्‍यांविरोधात तडीपारी, स्थानबद्धता तसेच मकोकाअंतर्गत कारवाई पुढील काळातही व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तडीपार आदेश पारित केलेल्या गुन्हेगारांची नावे

सुनील निवृत्ती पगारे (वय 26, रा. अवधूतवाडी, पंचवटी, नाशिक), अंकुश अरुण गायकवाड (वय 21, रा. गल्ली नं. 7, कालिकानगर, पंचवटी, नाशिक), अजय भीमा वळवे (वय 25, रा. ओमकारबाबा चाळ), शेषराव महाराज चौक, फुलेनगर, पंचवटी, नाशिक), जितेश उर्फ गुड्डू चिंतामण फसाळे (वय 26, रा. मुंजोबा चौक, मनपाच्या शिवाजी गार्डनजवळ, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक), उदय सुनील चारोस्कर (वय 21, रा. 56 नं. शाळेजवळ, लक्ष्मणनगर, फुलेनगर, पंचवटी, नाशिक), उमेश प्रल्हाद खनपटे (वय 21, रा. चव्हाण सिरॅमिकजवळ, अश्वमेधनगर, पेठरोड, म्हसरूळ, नाशिक) (टोळीप्रमुख), करण शांताराम आहेर (वय 19, रा. चव्हाण सिरॅमिकजवळ, अश्वमेधनगर, पेठरोड, म्हसरूळ, नाशिक), धनराज सदानंद गणेशकर (वय 19, रा. वडजाईमातानगर, मखमलाबाद रोड, म्हसरूळ, नाशिक), सूरज उर्फ चाचा निवृत्ती चारोस्कर (वय 25, रा. वेदश्री 32, रूम नं. 16, मखमलाबाद-लिंकरोड, म्हसरूळ, नाशिक), हर्षल प्रदीप काकडे (वय 19, रा. फ्लॅट नं. 8, साईपुष्पा सोसायटी, ओंकारनगर, म्हसरूळ, नाशिक), सुजित उर्फ चंग्या भास्कर पगारे (वय 31, रा. प्लॉट नं. 6, प्रीती पार्क सोसायटी, स्नेहनगर, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक), सुमित अशोक लोट (वय 25, रा. महालक्ष्मी चाळ, वडाळा नाका, भद्रकाली, जुने नाशिक), शाहरुख उर्फ सुरमा ताहिर शहा (वय 30, रा. ताहिर मंजील, दरबार रोड, गुमशाबाबा दर्गाजवळ, भद्रकाली, नाशिक), जुनेद तबराक चौधरी (वय 27, रा. फ्लॅट नं. 2, अमृतधाम समाज, त्रिकोणी गार्डन, द्वारका, नाशिक), विकी लक्ष्मण जोजे (वय 24, रा. शीतळादेवी मंदिरामागे, काझीगढी, कुंभारवाडा, भद्रकाली, जुने नाशिक), गणेश चंद्रकांत मोरे (वय 20, रा. सहकारनगर, भीमवाडी, गंजमाळ, भद्रकाली, नाशिक), अनुराग उत्तम सहेजराव (वय 23, रा. सहकारनगर, भीमवाडी, गंजमाळ, भद्रकाली, नाशिक), जुबीन उर्फ रजा जयनोउद्दीन सय्यद (वय 20, रा. घर नं. 1344, खडकाळी, भद्रकाली, नाशिक), आसिफ उर्फ इस्माईल शेख (वय 25, रा. घर नं. 3892, नानावली मशीद परिसर, भद्रकाली, नाशिक), वाजीद जैद शेख (वय 19, रा. पाण्याच्या टाकीजवळ, नानावली, भद्रकाली, नाशिक), राहुल अशोक ब्राह्मणे (वय 23, रा. बजरंगवाडी, 12 खोल्या, ता. जि. नाशिक), चेतन गोपाल जाधव (वय 26, रा. बजरंगवाडी, ता. जि. नाशिक), चंद्रकांत भरत वाघमारे (वय 37, रा. गोल्फ क्लब झोपडपट्टी, राजदूत हॉटेलच्या मागे, नाशिक), प्रथमेश उर्फ सोन्या अजय वाघ (वय 20, रा. मंगलवाडी, चोपडा लॉन्समागे, जुना गंगापूर नाका, नाशिक), वेदांत प्रवीण पाटील (वय 19, रा. घर नं. 45, पवननगर, महाकाली चौक, सिडको, नाशिक).

25 inmates deported for two years

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *