नाशिक

जिल्ह्यात दीड वर्षात दगावल्या 26 माता!

ग्रामीण भागात माता मृत्यूचे वाढते प्रमाण धोकादायक

नाशिक ः देवयानी सोनार
जिल्ह्यातील ग्रामीण भागात माता मृत्यूची संख्या वाढली आहे. गर्भारपणात प्रसूतीपूर्व, प्रसूतीनंतर रक्तस्राव, अ‍ॅनिमिया, हृदयविकार, उच्च रक्तदाब, अपघात आदी कारणांमुळे गेल्या दीड वर्षात 26 माता मृत्यू झाले आहेत. 2024-25 व 2025-26 च्या जुलैपर्यंतच्या आकडेवारीमुळे गंभीर चित्र समोर आले आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, 2024-25 मध्ये 13 माता मृत्यू झाले होते. 2025-26 च्या जुलैअखेरपर्यंतची संख्या 13 वर पोहोचली आहे. यामुळे यावर्षीही मृत्यूचा आकडा अधिक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अहवालानुसार, रक्तस्राव, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर सेप्सिस, अ‍ॅॅनिमिया, हृदयविकार, तसेच अपघात/आत्महत्या या प्रमुख कारणांमुळे माता मृत्यू झाले आहेत. याशिवाय सिंड्रोम, कोविड व इतर कारणांनीही मृत्यूची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, 2025-26 मध्ये हृदयविकार व रक्तस्रावामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
गर्भावस्था, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीनंतरच्या काळात महिलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट होते.
पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, येवला, मालेगाव, नाशिक यांसह अनेक तालुक्यांचा समावेश आहे. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील महिलांचा मृत्युदर अधिक असल्याचे अहवालातून दिसले
आहे.
दरवर्षी मातृ मृत्यूचा आकडा वाढत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा, तातडीची वैद्यकीय मदत व तज्ज्ञ डॉक्टर्सची उपलब्धता यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपजिल्हा रुग्णालयांत प्रसूतीसंबंधी आधुनिक साधनसुविधा व तत्पर सेवांची गरज निर्माण झाली
आहे.
माता मृत्यू रोखण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती, वेळेवर तपासणी, रक्ताची उपलब्धता आणि तातडीच्या उपचारासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

गर्भवती महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यायला हवा, अति जोखमीच्या मातांनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सल्ल्याने माहेरघर योजनेचा लाभ घ्यायला हवा. शासकीय दवाखान्यात वैद्यकीय सल्ल्यानुसार आहार आणि तपासणी, औषधोपचार, तसेच सोनोग्राफी शासकीय रुग्णालयात मोफत केली जो. ती करून घ्यावी.
– डॉ. हर्षल नेहते, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी

मृत्यूची कारणे 2024-25 मधील

प्रसूतीपूर्व रक्तस्राव                  02
प्रसूतीपश्चात रक्तस्राव            01
अ‍ॅनिमिया                               04
हृदयविकार                            02
मेंदूला सूज                             03
इतर                                       01
एकूण                                     13

 

2025 -26 जुलैपर्यंत

प्रसूतीपूर्व रक्तस्राव              03
प्रसूतीपश्चात रक्तस्राव       02
अ‍ॅनिमिया                           02
हृदयविकार                        01
अपघाती                            01
इतर                                  03
एकूण                                13

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago