आषाढीसाठी लालपरी सज्ज नाशिक विभागातून 260 बसेस

नाशिक ः प्रतिनिधी
आषाढीवारीसाठी लालपरी सज्ज झाली असून, नाशिक विभागातून 260 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.आषाढीवारीसाठी पंढरपूरात भाविकांना जाण्या-येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या नाशिक विभागाच्या विविध आगारातून बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आषाढी पंढरपूर यात्रा 6 ते 14 जुलै या कालावधीत भरणार आहे.यानिमित्ताने आगाराच्या कक्षेत पंढरपूर येथे जाणार्‍या आणि येणार्‍या यात्रेकरूंसाठी  बसेस सोडण्यात येणार असल्याचे विभागामार्ङ्गत कळविण्यात आले आहे. त्यासाठी नाशिक एक आणि नाशिक दोन महामार्ग बसस्थानक , , मालेगाव,सटाणा,मनमाड, सिन्नर,लासलगाव,नांदगाव, इगतपुरी,येवला कळवण, पेठ, पिंपळगाव येथून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
Devyani Sonar

Recent Posts

चोरी झालेली बाइक सापडली

शिलापूर : नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने चोरी झालेली मोटारसायकल जुन्या जनरल तिकीट घराजवळ मिळून…

3 hours ago

सर्व्हर डाऊनमुळे इंधन पुरवठा ठप्प; वेबसाइट हॅकची चर्चा

वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता, तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न सुरू मनमाड : प्रतिनिधी मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान…

3 hours ago

पिंपरखेडला बोगस डॉक्टरला अटक

नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल, औषधसाठा जप्त पळाशी : वार्ताहर अ‍ॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना जनतेच्या…

3 hours ago

गोंदेजवळ आयशरची कारला धडक; 5 म्हशी ठार

सिन्नर : प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर येथून देवनार-मुंबईकडे 21 म्हशी घेऊन जाणार्‍या आयशरने डाव्या…

4 hours ago

दिंडोरी, सुरगाण्यात अवकाळी पावसाचा कहर

वीजपुरवठा खंडित, घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान; भरपाईची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा,…

4 hours ago

एरंडगाव शिवारात युवकाचा मृत्यू

येवला : तालुक्यातील एरंडगाव शिवारातील विहिरीत पडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सतीश रामकृष्ण जाधव…

4 hours ago