format: 2; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 3; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 12582912;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 175.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 40;
120 उमेदवारांची माघार; अपक्षांमुळे डोकेदुखी
पंचवटी : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी पंचवटी विभागात एकूण 120 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून, 24 जागांसाठी 272 उमेदवार रिंगणात आहेत. पंचवटीत एकूण 392 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यातील 120 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यात प्रभाग क्रमांक 6 ड सर्वसाधारण गटातील शिवसेना उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार संजय पिंगळे व प्रभाग 5 ब सर्वसाधारण महिला गटातून कविता आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. माजी नगरसेविका शीतल माळोदे, जयश्री धनवटे, माजी नगरसेवक उल्हास घनवटे, हरिभाऊ लासुरे, संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज सादर केलेल्या सोमनाथ बोडके यांनी प्रभाग 3 क मधून अर्ज माघारी घेतला आहे. दीपक सानप यांचा अर्ज माघारी भाऊ मच्छिंद्र यांना उमेदवारी जाहीर म्हणून माघारी घेतला आहे. प्रभाग 4 सतनाम राजपूत शिंदेसेना अधिकृत उमेदवार असल्याने उर्वरित अर्ज मागे तसेच प्रभाग 4 मधील मोनिका हिरे यांना भाजप अधिकृत उमेदवारी मिळाली असून, त्यांनी दाखल केलेला डमी अर्ज मागे घेतला. प्रभाग 2 मधून रिद्धीश निमसे यांना क गटात उमेदवारी मिळाल्याने त्यांनी ड जागेवरील अर्ज मागे घेतला आहे.
प्रभाग 5 मधून अ जागेवर माजी नगरसेवक उल्हास धनवटे तर ब जागेवर माजी नगरसेवक जयश्री धनवटे यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केले होते. उमेदवारी मिळाली नाही म्हणून माघारी तसेच प्रभाग 4 मध्ये माजी खासदार स्व. माधवराव पाटील यांचे पुत्र संजय पाटील यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून ड गटातून अर्ज माघारी घेतला आहे. प्रभाग 2 क मधून रामभाऊ संधान यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केला होता, त्यांनी अर्ज माघारी घेतला. प्रभाग 2 मधून माजी नगरसेवक शीतल माळोदे तर प्रभाग 5 मधून महेश महंकाळे व विशाल गोवर्धने यांनी अर्ज माघारी घेतले आहे. 2 ड चंद्रशेखर लभडे व भाऊसाहेब निमसे यांना शिंदेसेनेने एबी फॉर्म दिला होता, त्यामुळे लभडे यांनी अर्ज माघारी घेतला आहे. प्रभाग एक भाजप पदाधिकारी पलंगे यांच्या मातोश्री यांनी माघारी अर्ज घेतला आहे. प्रभाग 55 माजी नगरसेवक हरिभाऊ लासुरे यांनी अपक्ष अर्ज भरला होता, माघारी घेतला आहे.
निवडणूक माघारी घेण्याच्या अवघ्या पाच मिनिटे कार्यालयात दाखल झाल्यानंतर एका समर्थक कार्यकर्त्याने गोंधळ घालत आक्रोश केल्याने अर्ज माघारी घेण्यासाठी आलेल्या माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्यांची अपक्ष उमेदवारी कायम राहिली आहे. शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे प्रभागातील निवडणूक लढत आता अधिकच रंगतदार होणार आहे. मनपा पंचवार्षिक निवडणूक 2026 रिंगणात उतरणार्या मनपा प्रभाग क्रमांक 3 चे माजी नगरसेवक कुंभारकर यांना भाजप पक्षाने उमेदवारी डावलल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी (दि. 2) अर्ज माघारीच्या अखेरचे 5 मिनिटे शिल्लक असताना दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी अपक्ष कुंभारकर हे अर्ज माघारी घेण्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयात आले. ते अर्ज माघारी घेण्यासाठी आल्याचे बघताच प्रतिस्पर्धी असलेल्या माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप यांनी त्यांना हाताला धरून निवडणूक कक्षात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी कुंभारकर यांच्यासमवेत आलेल्या त्या एका कार्यकर्त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू करताच कुंभारकर माघारी फिरले. त्यांना पुन्हा हाताला धरून सानप यांनी निवडणूक कक्षात नेताना घड्याळाचे काटे फिरले. तीन वाजताच निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दरवाजे बंद करण्यास सांगितले. तेव्हा कुंभारकर जिन्यातच होते. वेळ संपल्याचे ध्वनिक्षेपकावर जाहीर होताच कुंभारकर माघारी फिरले. त्यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी त्यांना घेरत माघारी का घेतला, असे विचारले असता कुंभारकर यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी तत्काळ काढता पाय घेतला. यावेळी त्यांनी आपण कोणत्याही दबावाला बळी पडलो नाही तसेच आपल्यावर कोणीही दबावतंत्राचा वापर केला नसल्याचे सांगत आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…