आज जागतिक मच्छर दिन
नाशिक : देवयानी सोनार
जिल्ह्यात जानेवारी ते जुलै 2025 या सात महिन्यांत मलेरियाचे एकूण 28 रुग्ण आढळले, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. ग्रामीण परिसर आणि नाशिक महापालिका क्षेत्रात हे रुग्ण नोंदले गेले असून, मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगण्यात आले.
जानेवारीत एक रुग्ण नोंदवला गेला. फेब्रुवारी व मार्चमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. एप्रिलमध्ये दोन, मे महिन्यात सात, जूनमध्ये पाच, तर जुलै महिन्यात 13 रुग्ण नोंदवले गेले. गेल्या दोन महिन्यांत रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागात एकूण आठ रुग्ण सापडले. नाशिक महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या जास्त असून, ती 20 वर पोहोचली आहे. यात मे महिन्यात 4, जून 5 आणि जुलैमध्ये 10 रुग्णांचा समावेश आहे. दुसर्या महापालिका क्षेत्रात मात्र एकही रुग्ण आढळलेला नाही.
जानेवारी ते जुलैदरम्यान जिल्ह्यात तब्बल सहा लाख 87 हजार 56 रक्त तपासण्या करण्यात आल्या. त्यांपैकी 28 जण मलेरियाने बाधित आढळले.
दरम्यान, ग्रामीण व शहरी भागात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम, फॉगिंग आणि औषधोपचार यांसह नियंत्रणाची कामे हाती घेतली आहेत. नागरिकांनीही घराच्या परिसरात साचलेले पाणी काढून टाकावे, डास प्रतिबंधक उपाय करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
हिवताप, डेंग्यू या कीटकजन्य आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत घराघरांत भेटी घेऊन तापरुग्णांचे रक्त नमुने संकलित करून तपासणीसाठी पाठविले जात आहेत. हिवताप दूषित रुग्णांना समूळ उपचार देण्यात येत आहे. प्रभावित भागात डास अळी सर्वेक्षण, धूरफवारणी, अबेटिंग, कोरडा दिवस पाळणे, गप्पी मासे सोडणे यांसारख्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जनजागृतीसाठी प्रभातफेरी, ग्रामसभा, शालेय कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यंदा शून्य मलेरिया वितरित करण्याची वेळ : गुंतवणूक करा, नवीन करा, अंमलबजावणी करा, हे घोषवाक्य देण्यात आले आहे. 2030 पर्यंत देशातून हिवताप निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
जागतिक मच्छर दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट
♦ डासांपासून होणार्या आजारांबाबत जनजागृती करणे.
♦ प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे,
♦ संशोधनाला चालना देणे. डास नियंत्रणासाठी उपाय.
♦ घरात व आसपास पाणी साचू न देणे.
♦ मच्छरदाणीचा वापर करणे.
♦ स्वच्छता व जनजागृती करणे.
एकूण रुग्ण – 28
ग्रामीण भाग – 08
नाशिक महापालिका – 20
एकूण रक्त तपासण्या – सहा लाख 87 हजार 56
दरवर्षी 20 ऑगस्ट जागतिक मच्छर दिन म्हणून साजरा केला जातो. मलेरिया रोग अॅनाफेलेस मादी डासामुळे होतो, हे
वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. डास हे सर्वांत घातक कीटक मानले जातात. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, पिवळा ताप यांसारखे अनेक आजार डासांमुळे होतात.
ताप आल्यास अंगावर न काढता रक्त तपासणी करून त्वरित उपचार घ्यावेत, घराभोवती स्वच्छता राखावी, साठलेले पाणी वाहते करावे, कोरडा दिवस पाळावा, डास प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करावा. हिवतापाची तपासणी व उपचार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहेत.
– डॉ. सुनीता एस. पिवळतकर, जिल्हा हिवताप अधिकारी, नाशिक
विविध विषयांवर चर्चा; थकबाकी वसुलीसाठी धोरण राबविण्याचा निर्णय देवळा ः प्रतिनिधी वाजगाव येथील ग्रामसभेत गावात…
जानोरी ग्रामसभेत ठराव; तसा शिक्षक दिल्यास हजर न करून घेण्याचा पवित्रा दिंडोरी : प्रतिनिधी जिल्हा…
वंचित दोनशे शेतकर्यांचा इशारा; कंपनी प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले नाही कंधाणे : वार्ताहर कंधाणे येथील खरीप…
शासनाच्या बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिकच्या फुलांचाच बोलबाला नाशिक ः प्रतिनिधीअवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीसाठी बाजारपेठ…
गणेशोत्सवातील राजकीय उत्सव नाशिक : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांकडून गणेशोत्सवाचा मुहूर्त…
सिन्नर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा प्रताप; ठेकेदार आणि अधिकार्यांचे संगनमत सिन्नर : प्रतिनिधी प्रशासकीय राजवटीत…