लासलगाव: समीर पठाण
राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे कडील सुधारित आदेश क्र रानिआ/जिपपंस- २०२२/प्र.क.१०/का.७ दि २२ जुलै २०२२ अन्वये नाशिक जिल्हा परिषद व निफाड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याची माहिती निफाड चे तहसीलदार शरद घोरपडे यांनी पत्रकान्वये दिली आहे
निफाड पंचायत समिती निर्वाचक गणासाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम दिनांक २८-७-२२ रोजी सकाळी दहा वाजता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निफाड उपबाजार हॉल येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांनी आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार घोरपडे यांनी केले आहे.