सिटीलिंकच्या वतीने बस फेर्‍यांमध्ये वाढ

नाशिक:  प्रतिनिधी

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने प्रवासी संख्येचा विचार करता काही नवीन मार्ग सुरू करण्याबरोबरच काही मार्गांवरील बस फेर्‍यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. खालीलप्रमाणे
१) मार्ग क्रमांक १३४ – नवीन सीबीएस ते कोणार्क नगर (संकलेचा सोसायटी) मार्गे निमाणी, अमृतधाम. – हा नवीन मार्ग सुरू करण्यात आला असून सदर मार्गावर सकाळी ६.१० वाजेपासून २०.४५ पर्यन्त एकूण २० बस फेर्‍या देण्यात आल्या आहेत.
२) मार्ग क्रमांक १३५ – नवीन सीबीएस ते पार्क साईट मार्गे अमृतधाम, बी डी कामगार नगर – हा देखील नवीन मार्ग सुरू करण्यात आला असुन सदर मार्गावर सकाळी ६.१० वाजेपासून १९.५० पर्यन्त एकूण १८ फेर्‍या करण्यात येत आहे.
३) मार्ग क्रमांक १४७ – नवीन सीबीएस ते मोहाडी मार्गे म्हसरूळ, वरवंडी, शिवनई, आंबे – या नवीन मार्गावर २ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून सकाळी ५.३० ते १८.३५ वाजेपर्यन्त एकूण १६ फेर्‍या या बसेसच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
४) मार्ग क्रमांक १२८ – निमाणी ते चुंचाळे गाव मार्गे त्रिमूर्ति चौक, कामटवाडे – सदर मार्गावर नवीन ४ बसेसची संख्या वाढविण्यात आली असून यामुळे आता सदर मार्गावर पूर्वीच्या ४ व नवीन ४ अश्या एकूण ८ बसेस कार्यरत असणार आहे. बसेस संख्या व पर्यायाने बस फेर्‍यांची संख्या वाढविण्यात आल्याने आता सदरील मार्गावर दर १५ मिनिटांना बस फेर्‍या उपलब्ध असणार आहे.
५) मार्ग क्रमांक २०१ – नाशिक रोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका, सिव्हिल, सातपुर, अशोक नगर – सदर मार्गावरील बस फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात आली असून आता पूर्वीच्या अर्धा तासाऐवजी दर १५ मिनिटांना बस फेर्‍या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
६) मार्ग क्रमांक २०३ – नाशिक रोड ते सिम्बोईसीस कॉलेज मार्गे सी.बी.एस, पवन नगर, उत्तमनगर – सदर मार्गावरील बस फेर्‍यांमध्ये देखील वाढ करण्यात आली असून या मार्गावर देखील पूर्वीच्या अर्धा तासा ऐवजी आता दर १५ मिनिटांना बस फेर्‍या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रवाश्यांची वाढती संख्या व मागणी लक्षात घेता हे नवीन मार्ग सुरू करण्याबरोबरच काही मार्गावरील बस फेर्‍यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाश्यांनी या बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *