जुने नाशिक : वार्ताहर
येथील चर्मकार लेन परिसरातील आझाद चौकातील जय भारत तरुण मित्रमंडळ व जय भवानी मित्रमंडळातर्फे शिवजन्मोत्सवानिमित्त शिवरायांचा थोडक्यात इतिहास सांगणारा 30 फुटांचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे.
देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी मंडळाचे भूषण शिंदे, प्रशांत दिवटे, अभिजित रहाटे, अमोल लिंगायत, प्रशांत खडकाळे, गजेंद्र पवार, ईश्वर दिघे, गौरव वाघ, राहुल भोईर, सोनू परदेशी, रोशन कानडे, लक्ष्मण वाकोडे, सुमित दिघे, रवींद्र बुलाखे, सागर सूर्यवंशी, विकी कानडे, मयूर सूर्यवंशी, ऋषिकेश सोनवणे, सतीश गाजूल, मंगेश सांबळे, रोहित सोनवणे, किरण डोईफोडे, योगेश मोरे, सचिन कोल्हे, संदीप लिंगायत, पिंटू कानडे, हरीश दिघे, विनोद पवार, दिलीप भोईर, सोनू पवार, ललित दिघे, योगेश खडसन, साई लिंगायत, विकी कानडे, प्रवीण बोरसे आदी उपस्थित होते.
30-foot grand view at Charmkar Lane