नाशिक : प्रतिनिधी
कोरोनामुळे खंड पडलेला पुष्पोत्सव नवीन वर्षात उत्सहात साजरी केला जाणार आहे. त्यादृष्टीने पालिकेच्या उद्यान विभागाकडून तयारी सुरु केली आहे. दरम्यान
या पुष्पोत्सवसाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च अपेक्षित असून बजेटमध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
करोनामुळे पुष्प महोत्सव खंडित झाले होते ते आता पुन्हा होणार आहे. या पुष्पोत्सवात पुष्परचना, पुष्परांगोळी, गुलाब राजा, गुलाब राणी, गुलाब राजकुमार – राजकुमारी यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबरच बंगलो गार्डन स्पर्धाही भरविली जाते. त्याला नाशिककरांचा भरपूर प्रतिसाद देखील दरवर्षी मिळत राहतो. पुष्पोत्सवात सुमारे २ हजाराहून अधिक फुले, झाडांचे प्रकार पाहायला मिळायचे. बोन्साय, कॅक्टस, इनडोअर – आऊटडोअर प्लॅन्टिंग ह्यांचे कमालीचे आकर्षण असायचे. याशिवाय, या महोत्सवात बागकामासाठी लागणारे साहित्य, अवजारेही उपलब्ध करून द्यायची.
नाशिक महापालिकेच्या वतीने तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा पुष्पोत्सव’ भरविण्यात येणार आहे. मनपाच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागामार्फत त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. जानेवारी २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याचा महापालिकेचा विचार आहे. १९९३ पासून महापालिकेच्यावतीने राजीव गांधी भवनच्या इमारतीत व बाहेरील उद्यानात पुष्पोत्सवाचे आयोजन केले जात होते.