रेल्वे चाइल्ड हेल्पलाइनच्या मदतीने 228 बालकांना दिलासा
नाशिक : देवयानी सोनार
जानेवारी ते ऑगस्ट 2025 या कालावधीत जिल्हा चाइल्ड हेल्पलाइनकडे तब्बल 330 तक्रारींची नोंद झाली आहे. बालहक्कांचे उल्लंघन, शोषण, बालविवाह, बालकामगार आदी गंभीर प्रकरणांत हेल्पलाइनने तातडीने कार्यवाही करून अनेक मुलांचे संरक्षण करण्यात आले आहे.
रेल्वे चाइल्ड हेल्पलाइनने जानेवारी ते ऑगस्ट 2025 या आठ महिन्यांच्या कालावधीत विविध समस्यांनी ग्रस्त 228 बालकांना मदतीचा हात दिला आहे. या कालावधीत अनेक हरवलेली व सापडलेली मुले, भिक्षेकरी तसेच तस्करीच्या विळख्यात अडकलेली मुले यांना योग्य मदत व आधार मिळाला.
आकडेवारीनुसार, वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या एका बालकाला उपचार मिळवून देण्यात आले, तर 36 बालकांना भिक्षेकरी अवस्थेतून मुक्त करण्यात आले. एक हरवलेले बालक पालकांपर्यंत पोचविण्यात आले. 180 सापडलेल्या बालकांना सुरक्षिततेच्या छत्राखाली आणण्यात आले. याशिवाय, बालतस्करीच्या एका प्रकरणात तातडीची मदत, दोन बालकांना समुपदेशन, तीन बालकांना तात्पुरता निवारा, तर चार बालकांना संगोपनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
हेल्पलाइनकडे आलेल्या आकडेवारीनुसार बालसंगोपनाशी संबंधित 70 प्रकरणे सर्वाधिक नोंदली गेली. त्यानंतर बालविवाहाचे 64, कौटुंबिक वादाचे 37, शोषणापासून संरक्षणासाठी 25, बालकामगार 19, हरवलेले 18 व सापडलेल्या 15 बालकांची प्रकरणे नोंदली गेली. लैंगिक शोषणाची 15, बाल भिक्षेकरी 13, समुपदेशन 13, प्रशासकीय 15, निवासव्यवस्था 19, वैद्यकीय मदत तीन, पुनर्वसन एक, शैक्षणिक मदत एक आणि बालतस्करीची दोन प्रकरणे हेल्पलाइनसमोर आली.
बालकांच्या संरक्षणासाठी व हक्कांसाठी कार्यरत असलेली हेल्पलाइन ही मुलांना संकटातून मुक्त करून सुरक्षिततेकडे नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संबंधित शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व पोलीस प्रशासनाच्या मदतीने या प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली आहे.
महिला व बालकल्याण समिती अशा मुलांची गरज पाहून त्यांच्या पुनर्वसनासाठी निर्णय घेते. रस्त्यावर किंवा रेल्वे स्टेशन येथे बालके आढळली तर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना बालकल्याण समितीपुढे घेऊन जातात. त्यांच्या निवार्याची सोय केली जाते. पालकांचा शोध लागल्यास त्यांच्या ताब्यात ही बालके दिली जातात. पालकांचा शोध लागेपर्यंत ही बालके संस्थेत दाखल करून घेतली जातात.पालक मुलांना सांभाळण्यास सक्षम असल्यास त्यांच्या ताब्यात दिले जाते, अथवा त्यांची बालगृहात व्यवस्था केली जाते. पालकांचा शोध न लागल्यास तिथेच त्यांचे शिक्षण आणि इतर सेवा दिल्या जातात. बालहक्कांचे उल्लंघन, अत्याचार किंवा अन्यायग्रस्त मुलांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी नागरिकांनी 1098 या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जानेवारी ते सप्टेंबर 2024 मध्ये नऊ महिन्यांत 133 बालके शून्य ते 18 वयोगटातील सापडली होती. 131 बालके पालकांच्या कुशीत सुखरूप पोहोचली होती.
रेल्वे चाइल्ड हेल्पलाइन
जानेवारी ते ऑगस्ट 2025 आकडेवारी
वैद्यकीय मदत 01
बाल भिक्षेकारी 36
हरवलेले बालक 01
सापडलेली बालके 180
बालतस्करी 01
समुपदेशन 02
निवारा 03
बालसंगोपन 04
एकूण 228
चाइल्ड हेल्पलाइनकडे प्राप्त आकडेवारीवरून बालकांच्या सुरक्षिततेसंबंधी विविध आव्हानांचा स्पष्ट प्रत्यय येतो. तथापि, हेल्पलाइनच्या माध्यमातून बालकांना वेळेवर मदत, आवश्यक संरक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहाय्य व पुनर्वसन उपलब्ध करून दिले जाते. बालहक्क संरक्षण व बालकांच्या सुरक्षिततेसाठी ही यंत्रणा सातत्याने कार्यरत असून, या उपक्रमाला समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे.
– प्रणिता तपकिरे, प्रकल्प समन्वयक, चाइल्ड हेल्पलाइन, नाशिकबालकांसंदर्भात कुठेही काही अत्याचार, अपराध घडत असल्यास अथवा आपल्या आसपास कोणी बालक संकटात असेल किंवा त्याला मदतीची गरज असेल, अशा बालकांसाठी 1098 या क्रमांकावर संपर्क करावा.
– सुनील दुसाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नाशिक
जिल्हा चाइल्ड हेल्पलाइन जानेवारी ते ऑगस्ट 2025 आकडेवारी
वैद्यकीय मदत 03
शोषणापासून संरक्षण 25
बाल भिक्षेकरी 13
बालविवाह 64
हरवलेली बालक 18
सापडलेली बालक 15
बालकामगार 19
पुनर्वसन 01
लैंगिक शोषण 15
बालतस्करी 02
कौटुंबिक वाद 37
समुपदेशन 13
शैक्षणिक मदत 01
निवासव्यवस्था 19
प्रशासकीय 15
बालसंगोपन 70
एकूण 330
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…